बदलापूर! भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी विधानसभा निहाय होणार,, सुमारे २९ फेऱ्यात होणार मतमोजणी,

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चार जुन रोजी होणार असुन भिवंडी लोकसभेच्या मतदानाची मोजणी कल्याण पडघा मार्गावरील के यु डी, कंपाऊंड येथे होणार असुन सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात करण्यात येणार आहे, या ठिकाणी एकुण १२ लाख ५० हजार ७६ मतदान झालेले असुन मतदान मोजणी साठी प्रत्येक विधानसभा प्रमाणे भिवंडी मधिल सहा विधानसभे पैकी पाच विधानसभे साठी एकुण १४ टेबल लावण्यात येणार आहेत, आणि मुरबाड विधानसभा अंतर्गत २१ टेबल,तर टपाली मोजणी साठी १४ टेबल आणि अत्यावश्यक सेवा कर्मचारी व गृह मतदान मोजणी साठी १ टेबल, अशा प्रकारे एकुण १०६ टेबल भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी करता लावण्यात येणार आहेत, या मध्ये ४ हजार ३८९ टपाली मतदान पत्रीका असुन ही मतमोजणी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार कोष्टी यांच्या निगराणी खाली होणार आहे, या ठिकाणी भिवंडी ग्रामीण २५ फेऱ्या, शहापूर २४ फेऱ्या, भिवंडी पश्चिम २२ तर भिवंडी पूर्वीच्या २३ फेऱ्या होणार आहेत, या मध्ये कल्याण पश्चिम २९ तर मुरबाड विधानसभा मतमोजणी साठी २५ फेऱ्या होणार आहेत, प्रत्येक मतमोजणी टेबलवर एक निरिक्षक, सहाय्यक निरीक्षक, शिपाई आणि केंद्रीय सुक्ष्म निरिक्षक नेमण्यात आले असून केंद्रीय अयोगा मार्फत देखील दोन निरिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत, दुपारी चार वाजेपर्यंत ही मतमोजणी पुर्ण होणार असल्याचा अंदाज या वेळी व्यक्त केला जात आहे, कर्मचारी वर्गाचे रॅडेमायझेशन केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडून सकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे