बदलापूर! कोरोना काळात बंद पडलेली बदलापुर ते टिटवाळा बस सेवा पुन्हा सुरू ,, प्रवाशांकडून समाधान व्यक्त,

सन २०१९ पासून कोरोना काळात बंद पडलेली बदलापुर ते टिटवाळा बस पुन्हा एकदा सुरू करण्यात आली असल्याने बदलापूर मधिल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे,कोरोना मध्ये ही बंद झाल्या नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही बससेवा सुरू करण्यात आली होती परंतु प्रवासी संख्या कमी असल्याने ही बससेवा पुन्हा बंद करण्यात आली होती, परंतु स्थानिक नगरसेवक किरण भोईर यांनी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच ठेवला असल्याने अखेर प्रशासनाने दखल घेऊन पुन्हा एकदा बदलापुर ते टिटवाळा बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे ,त्याच प्रमाणे बदलापुर ग्रामीण परिसरातील प्रवाशांसाठी देखील पुन्हा एकदा बससेवा सुरू करण्यात आली असून, बदलापुर बोराटपाडा, पिंपळवाडी,तसेच बारवी डॅम पर्यंत बससेवा सुरू करण्यात आली असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तसेच स्थानिक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे,नुकताच एस टी आगार व्यवस्थापक यांच्या हस्ते नारळ फोडून ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे, बस डेपो मध्ये प्रवाशांसाठी शौचालयची व्यवस्था नसल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण नगरपालिका प्रशासनाकडे शौचालय बांधून देण्याची मागणी केली असून हा प्रश्न देखील लवकर मार्गी लागेल असे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी सांगितले आहे , प्रतिनिधी रुतिकेश रोकडे लोकपालक न्युज बदलापुर