कुळगाव बदलापुर नगरपालिका हद्दीतील सर्व इमारतींमध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाची सक्तीने अंमलबजावणी करा_प्रदिप गोविंद रोकडे (अध्यक्ष ठाणे जिल्हा कॉंग्रेस पर्यावरण विभाग)

सध्या निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड देखील होत असल्याने त्याचा थेट परिणाम हा नैसर्गिक वातावरणावर होत आहे, मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडी मुळे त्याचा परिणाम पावसाच्या पाण्यावर होत आहे, त्या मुळे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना आवश्यक असा पाणी पुरवठा होताना दिसत नाही, या मुळे “पाणी आडवा पाणी जिरवा” या अंतर्गत शहरातील विकासक तसेच सर्व सोसायट्यांना रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाची सक्तीने अंमलबजावणी करण्याची मागणी ठाणे जिल्हा कॉंग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे, परवानगी पत्रात तशा प्रकारची अट घातली असताना देखील, शहरातील विकासक किंवा सोसायटीचे पदाधिकारी रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाची अंमलबजावणी करताना दिसत नाहीत, सध्या पाण्याची पातळी जमिनी पासून जास्त प्रमाणात खाली गेली असल्याने विहीर किंवा बोर खणताना शेकडो फुटावर देखील पाणी लागणे मुश्किल झाले आहे, भविष्यात याचा गंभीर परिणाम पुढच्या पिढीला भोगावा लागेल, या साठी अशी वेळ येऊ नये म्हणून प्रत्येक ईमरती मध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश पारित करावेत, अन्यथा असे विकासक कींवा सोसायट्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रदीप गोविंद रोकडे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे,