ताज्या घडामोडी

अंबरनाथ शहर काँग्रेस पक्षाच्या पर्यावरण विभाग अध्यक्ष पदी मुनिर मुस्ताक शेख यांची नियुक्ती,,,

पर्यावरण विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांच्या हस्ते नियुक्ती

अंबरनाथ बदलापूर शहर पर्यावरण विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक कॉंग्रेस पक्षाचे पर्यावरण विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,

या वेळी अनेक कार्यकर्त्यांचा पक्षा मध्ये प्रवेश घेण्यात आला, अंबरनाथ शहरातील पर्यावरण विभागाच्या कामाला गती मिळण्यासाठी मुनिर मुस्ताक शेख यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता, त्यांची अंबरनाथ शहर पर्यावरण विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली, पर्यावरण विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन मुनिर मुस्ताक शेख यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

, या वेळी पर्यावरण विभागाच्या पदाधिकाऱ्यांसह अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत कारंडे, ठाणे जिल्हा कॉंग्रेस युवक अध्यक्ष अजगर खान, बदलापुर शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान, अंबरनाथ शहर अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष आत्माराम तांबे,हर्षद भोईर,देवराज अलझेंडे,नईम शेख, संकेत तांबे, अकबर शेख यांचा सह बदलापुर अंबरनाथ मधिल पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.