ताज्या घडामोडी

बदलापूर पुर्व अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणी वरीष्ठ पोलिस निरीक्षक शितोळे यांची तडकाफडकी बदली

प्रतिनिधी रुतिकेश प्रदीप रोकडे

बदलापूर पुर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे यांची तातडीने बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे, दिनांक ११ आणि १२ ऑगस्ट रोजी बदलापुर पुर्व आदर्श विद्यालयातील कर्मचारी यांनी त्याच शाळेत शाळेत शिकत असलेल्या चार वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला, विनयभंग प्रकार हा लैंगिक आत्याचार करण्याचाच प्रकार असल्याचे बोलले जाते, या बाबत बदलापुर पश्चिम पोलिस सदर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संपर्क करुन घडलेल्या गंभीर प्रकाराची माहिती देऊन पोलिस प्रशासन आणि शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने या प्रकरणी दखल घेऊन ठाणे जिल्हा पोलिस आयुक्तांना ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याने, बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे यांची तातडीने बदली करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.