सोलापूर!बाप-लेकाचे अपहरण करणारे तिघे अटकेत,,,, एक किलो सोन्याची मागणी; मोबाईल क्रमांकावरून,, फौंजदार चावडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

सोलापूर (प्रतिनिधी ), एक किलो सोन्याच्या खंडणीसाठी बाप लेकाचे अपहरण केल्या प्रकरणी तिघांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे.
महेश गजेंद्र शिंगाडे, (रा. मुळेगांव, ता.दक्षिण सोलापूर, उमेश अंकुश बंडगर, शंकर ऊर्फ दादा अनिल माशाळकर (दोघे रा. इटकळ, ता. तुळजापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. तर त्यांनी नागेश धर्माधिकारी व त्यांचा मुलगा समर्थ धर्माधिकारी यांचे अपहरण केले होते. नागेश यांच्या पत्नी काळम्मा ऊर्फ स्नेहा धर्माधिकारी (वय ५०, रा. प्लॉट नंबर २, दुसरा मजला, हरिप्रसाद
अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, सोलापूर) यांनी अपहरणाची फिर्याद दिली होती. त्यावरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२१ सप्टेंबर रोजी संशयितांनी नागेश व त्यांचा मुलगा समर्थ यांचे अपहरण करून शहापूर येथील शेतामध्ये नेले. तेथे त्यांना जबर मारहाण केली. त्यांनी एक किलो सोन्याची खंडणी मागून त्यासासाठी त्यांना पंढरपूर, माळशिरस, फलटण भागातील डोंगराळ व माळरानातील भागात नेऊन त्यांच्याकडील
कारमध्ये डांबून ठेवले. खंडणीची
पूर्तता होत नसल्याचे २३ सप्टेंबर 2024 रोजी
फिर्यादी यांचे पती व मुलास सोडून देऊन
मोबाईल बंद करून पसार झाले होते
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाल पोलिस निरीक्षक विकास देशमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे, हवालदार प्रवीण चुंगे पोलिस अंमलदार कृष्णा बडुरे, दत्ता कोळवले, विनोद व्हटकर, नितीन जाधव यांची तपासात महत्त्वा भूमिका राहिली.
*पोलिसांचा कौश्यल्यपूर्ण तपास*
संशियीतांचा शोध घेताना पोलिसांकडे कोणतीही उपयुक्त माहिती नव्हती अपहरणानंतर फिर्यादी काळम्मा उर्फ स्नेहा यांना एक अनोळखी मोबाईल वरून कॉल आला होता त्या मोबाईल कॉल च्या आधारे पोलिसांनी संशयीताचा शोध लावला संशयीतांच्या ठाव ठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी सतत कौशल्यपूर्ण तपास केला ते हडपसर येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे पोलिसांनी शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास माळवाडी परिसरातून तिघाही संशयीतांना अटक करण्यात आली.