ताज्या घडामोडी
मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुभाष पवार यांना उमेदवारी जाहीर

अखेर महाविकास आघाडी कडून मुरबाड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र शुभाष पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मधुन उमेदवारी घोषित करण्यात आली आहे, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे,शुभाष पवार हे २८ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली, शिवसेना शिंदे गटातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन शुभाष पवार यांनी तुतारी आपल्या हाती घेतली असल्याने, मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचे बोलले जात आहे, या मतदारसंघात महायुती कडून किसन कथोरे तर महाविकास आघाडी कडून सुभाष पवार हे एकाच समाजाचे उमेदवार आमनेसामने उभे असल्याने या वेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघातील मतदार आता कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे