बदलापूर! महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांचे प्रचार फेरीत जांभीळघर मध्ये जोरदार जंगी स्वागत,,, जेसीबी मधुन फुलांची उधळण,,,

मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्या गाव संवाद यात्रेला मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी देखील किसन कथोरे यांनी बदलापुर ग्रामीण परिसरातील जांभीळघर या गावाला भेट देऊन मतदारांशी संवाद साधला
, या वेळी राहटोली ग्रामपंचायतचे उपसरपंच सुधिर गायकवाड, सदस्य सविता सुधिर गायकवाड, माजी सरपंच भगवान चाळके आणि त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार किसन कथोरे यांचे उत्साहात स्वागत केले,
जांभीळघर गावात किसन कथोरे यांनी प्रवेश करताच स्थानिक नागरिकांनी किसन कथोरे यांच्यावर जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत त्यांच जंगी स्वागत केले,तर महिला पदाधिकारी यांनी औक्षण करून किसन कथोरे यांना विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या,राहटोली ग्रामपंचायतचे उपसरपंच सुधिर गायकवाड हे आमदार किसन कथोरे यांचे कट्टर समर्थक मानले जात असुन,राहटोली गृप ग्रामपंचायत परिसरातुन किसन कथोरे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देणार असल्याचे सुधिर गायकवाड यांनी म्हटले आहे,