ताज्या घडामोडी
जिल्हापरिषद डोहोळे पाडा शाळेत महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस उत्साहात संपन्न

विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला विद्यार्थांनी षुप्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. तसेच सर्व विद्यार्थांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
मुख्याध्यापक अशोक गायकवाड यांनी विद्यार्थी दशेतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
विद्यार्थी दिनानिमित्त सर्व विद्यार्थांना लेखन साहित्य कीट (पेन,पेन्सिल, खोडरबर, शाॅपनर, पट्टी) व चाॅकलेट वाटप करण्यात आले.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन उत्साहात संपन्न करण्यात आला.
या वेळी मुख्याध्यापक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख व विद्यार्थी उपस्थित होते.