राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात,,, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिन्ह गोठवण्याची शक्यता,,,

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत चिन्ह “इंजिन “धोक्यात आले असून, कोणत्याही क्षणी हे अधिकृत चिन्ह गोठवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १२५ जागा लढवल्या, परंतु मनसेला मात्र या निवडणुकीत भोपळा फोडता आला नाही,राज ठाकरे यांना हा निकाल अविश्वसनीय वाटत असला तरी त्यांच्या पक्षाची मान्यता मात्र रद्द होण्याची चिन्हे आहेत, प्रादेशिक पक्षांना काही नियम असतात,पक्षाची मान्यता शाबूत ठेवण्यासाठी प्रत्येक प्रादेशिक पक्षांना एकुण मतदाना पैसे ८% मतदान आणि किमान एक जागा जिंकने ,६% मतदान आणि २ जागा जिंकने किंवा ३% मतदान आणि ३ जागा जिंकने गरजेचे आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या पैकी कोणताही निकष पूर्ण करता आला नाही,२००९ च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकुण १३ जागा जिंकल्या होत्या, त्या नंतर २०१४ च्या निवडणुकीत मनसेने २१९ जागा लढवत एक जागा जिंकली होती,अशाच प्रकारे २०१९ मध्ये देखील शंभरच्या आसपास जागा लढवुन एकच जागा जिंकली होती,आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने १२५ जागा लढवल्या, परंतु या निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही, या निवडणुकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे स्वतः उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते, परंतु अमित ठाकरे यांना देखील अपयश स्विकारावे लागल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत चिन्ह आणि मान्यता निवडणूक आयोग रद्द करणार किंवा कसे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे,