मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून, येवला लासलगाव मतदारसंघातील २५१५ योजनेअंतर्गत मुलभूत सुविधांच्या १० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची स्थगिती उठविली,
नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक :- महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला लासलगाव मतदारसंघातील २५१५ योजनेअंतर्गत मुलभूत सुविधांच्या १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची स्थगिती उठविण्यात आली आहे. लवकरच या विकास कामांना सुरुवात होणार असून मतदारसंघातील नागरिकांना आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत
. येवला मतदारसंघातील स्थगिती दिलेल्या विविध विकास कामांची स्थगिती उठविण्यासाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. त्यानुसार येवला मतदारसंघातील मुलभूत सुविधांअंतर्गत १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची स्थगिती उठविण्यात येऊन निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये येवला तालुक्यातील गवंडगाव येथे सभामंडप बांधण्यासाठी १५ लक्ष, नगरसूल येवला येथे ग्रामसचिवालय बांधण्यासाठी २५ लक्ष, आडगांव रेपाळ येथे व्यायामशाळा बांधण्यासाठी १२ लक्ष,बदापूर येथे महादेव मंदिर समोर सभामंडप, मानोरी बु. येथे सभामंडप, अंगणगांव येथे अभ्यासिका, चिचोंडी खु. रामेश्वर महादेव मंदिर येथे सभामंडप, अंदरसूल येथे साईबाबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे, जळगाव नेउर येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप,आंबेगाव येथे सभामंडप, बल्हेगाव येथे सामाजिक सभागृह, महालखेडा पाटोदा येथे सभामंडप बांधणे, खैरगव्हाण येथे मंदिरासमोर सभामंडप,अंदरसूल येथे तेली समाज करिता सभामंडप, खामगाव येथे सभामंडप, मुखेड येथे गणपती मंदिर ते महानुभाव आश्रम येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण, कोटमगाव येथे स्मशानभुमी घाट बांधकाम व अनुषंगिक कामे, नगरसूल येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण,अंदरसूल येथे रामेश्वर महादेव मंदिर सभामंडप, दुगलगाव येथे मारुती मंदिरासमोर सभामंडप, पाटोदा येथे मारुती मंदिरासमोर सभामंडप, कोळम खु. येथे सभामंडप,कोळम बु. येथे सभामंडप, राजापूर येथे मारुती मंदिरासमोर सभामंडप, कातरणी येथे खंडोबा मंदिरासमोर सभामंडप, देवठाण येथे शनी मंदिरासमोर सामाजिक सभागृह, बाभूळगाव खु. येथे सप्तशृंगी मंदिरासमोर सभामंडप, ममदापूर येथे खंडेराव मंदिरासमोर सभामंडप,अंदरसूल येथे शनैश्वर मंदिराजवळ सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी प्रत्येकी १५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. येवला तालुक्यातील अनकुटे येथे शनिमंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ३० लक्ष, रामवाडी सायगाव येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लक्ष, शिरसगाव लौकी येथे वाचनालय इमारत, कोटमगाव खु. येथे दशक्रिया शेड, नांदेसर येथे रस्ता कॉंक्रीटीकरण, उंदीरवाडी येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे, अंदरसूल येथे गणपती मंदिरासमोर सभामंडप विस्तारीकरण, अंगुलगाव येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण, सायगाव येथे स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण, गुजरखेडे येथे स्मशानभूमी बांधण्यासाठी प्रत्यकी १० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरसूल येथे मारुती मंदिरा समोर सभामंडप बांधण्यासाठी २० लक्ष, अंदरसूल येथे देशमुख गल्ली मारुती मंदिर परिसर सुधारणा, धामोडे येथे सभामंडप, विखरणी येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण, कुसूर येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी १२ लक्ष तर देवदरी येथे सभामंडप बांधण्यासाठी १४ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण, कोळगाव येथे स्मशानभूमी व घाट बांधणे, लासलगाव येथे वार्ड क्र. १ मध्ये रस्ता कॉंक्रीटीकरण, लासलगाव येथे शिक्षक कॉलनी मध्ये कॉंक्रीटीकरण, विंचूर येथे शनिमंदिर परिसर सुशोभिकरण, विंचूर ग.न. २४४ येथे कोष्टी समाजासाठी सभामंडप, टाकळी विंचूर ते १२ बंगले येथे भूमिगत गटार, पाचोरा बु. येथे सभामंडप, लासलगाव स्टेशन रोड (टाकळी विंचूर) येथे रस्ता कॉंक्रीटीकरण, मरळगोई खु. येथे मोठे बाबा मंदिरासमोर सभामंडप, पिंपळगाव नजिक येथील मुस्लीम वस्तीत रजा नगर येथे रस्ता कॉंक्रीटीकरण, रुई, येथे सभामंडप, देवगाव येथे खंडेराव मंदिरासमोर सभामंडप, नांदूरमध्यमेश्वर येथे मारुती मंदिरासमोर सभामंडप, नांदगाव येथे सभामंडप, टाकळी विंचूर येथे सभामंडप बांधण्यासाठी प्रत्येकी १५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर निफाड तालुक्यातील लासलगाव येथे आहेर वकील ते सुमती चौक कॉंक्रीटीकरण करण्यासाठी २० लक्ष, लासलगाव येथे मुस्लीम कब्रस्तानसाठी संरक्षक भिंत व अनुषंगिक कामे करण्यासाठी २२ लक्ष, लासलगाव येथे महिलांसाठी जिम (व्यायामशाळा) बांधण्यासाठी ३० लक्ष, पाचोरा बु. येथे महानुभव पंथीय दफनभूमी अनुषंगिक कामे, विंचूर येथील इदगाह कब्रस्थानला संरक्षण भिंत बांधणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी प्रत्येकी १२ लक्ष,टाकळी विंचूर, संधान नगर येथे कॉंक्रीटीकरण व बोकडदरे येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून एकूण १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची स्थगिती उठविण्यात आली आहे