लक्झरी बस मधुन गुटख्याची वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण पोलिसांकडून अटक,,

ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री डॉ डि एस स्वामी तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक भरत तांगडे, यांनी ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या, मानवी शरिरास अपायकारक गुटखा खरेदी/विक्री व वाहतूक करण्यास प्रतिबंध करणे व त्यावर कारवाई करणे बाबत आदेश दिले असताना, त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश मनोरे यांनी जिल्ह्यात अशा प्रकारचे प्रतिबंधित गुटखा खरेदी विक्री तसेच वाहतूकी बाबत गोपनीय माहिती मिळवुन, कारवाई करणे कामी, वेगवेगळे पथक तयार करुन त्यांना मार्गदर्शन केले,,
सदर पथक अमली पदार्थ व अवैध गुटखा विक्री व वाहतूक बाबत माहिती मिळवित असताना, दिनांक १६/१/२०२५ रोजी रात्री आठ वाजता पो,हवा/प्रकाश साईल यांना गस्ती दरम्यान, गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार, शहापूर खर्डी येथील मौजे गोलभण गावचे हद्दीत नाशिक मुंबई हायवे रोडवर, हॉटेल डायमंड जवळ आरोपी जोगेंद्र प्रसाद शाह,पीता दुधनाथ शाह वय वर्षे ५४ राहणार आय सी कॉलनी खाडी किनारी झोपडपट्टी,रामु यादव यांची खोली, लिंक रोड बोरिवली पश्चिम मुंबई याने आपले ताब्यातील आयशर कंपनीच्या लक्झरी बस क्रमांक एम पी ०१ झेड एस्क ९९५४ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखुजन्य गुटखा पदार्थांचा माल राव सर्कल इंदोर मध्य प्रदेश येथुन भरुन तो माजीवडा ठाणे येथे वाहतूक करुन घेवून जात असताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांच्या ताब्यातील ९,३७,२०० रुपये किंमतीचा गुटखा माल,३० लाख रुपयांची लक्झरी बस,पाच हजार रुपयांचा मोबाईल फोन,असा एकूण ३९ लाख ४२ हजार २०० रुपयांचा माल जप्त करुन ताब्यात घेण्यात आला, आरोपीं विरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२७४,२७५,२२३ ,३(५) तसेच अन्न सुरक्षा कायदा मानदे कायदा २००६ चे कलम ३(१) (झेड) (झेड)(आय),२६(२)(आय)४,२७(१)३०(२)(ए) व अन्न सुरक्षा आयुक्त यांचे कडिल महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग, चार क्रमांक ६९ दिनांक १२ जुलै,२०२४ चे उल्लंघन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
सदरची कारवाई मा, पोलिस अधीक्षक श्री डॉ डि एस स्वामी ठाणे जिल्हा ग्रामीण, तसेच श्री भरत ता़ंगडे,अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, यांनी दिलेला आदेश व सुचना प्रमाणे श्री सुरेश मनोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री महेश कदम,स,फो, सुनील कदम, पोलिस हवा,प्रकाश साईल, संतोष सुर्वे, गोविंद कोळी, पोलिस शिपाई स्वप्निल बोडके, यांच्या पथकाने केली असुन, गुन्ह्याचा पुढिल तपास शहापूर पोलिस ठाणे करत आहेत,