ताज्या घडामोडी

_कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांनी चालु असलेल्या विकास कामांचा घेतला आढावा !_

_कामे त्वरीत मार्गी लावण्याच्या संबंधीतांना दिल्या सुचना_

(पत्रकार आनंद गायकवाड याज कडून)

कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांनी बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ ची प्रगती, ठाणे फ्री वे तसेच उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा आढावा घेण्यात आला . या सर्व प्रकल्पांचा आढावा घेत त्यांच्या पूर्णत्वासाठी योग्य त्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या .
या प्रकल्प उभारणीतील अडचणींवर तोडगा काढत हे प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्यास सांगण्यात आले .
यावेळी खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महत्वाचे प्रकल्प आणि त्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण, कामांची पूर्तता आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणी या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रकल्पांना गती द्यायची असेल तर लवकरात लवकर जमीन अधिग्रहण करा, अशी सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली .
बदलापूर – कांजुरमार्ग मेट्रो मार्ग १४ चा फायदा अधिकाधिक भागाला कसा होईल, त्यासाठी मार्गाच्या आरेखनात बदल करता येईल का याची चाचपणी करण्याची सूचना केली गेली .

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील ३८० कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येवून रखडलेल्या रस्त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या .

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व भागातील अनेक वर्षे रखडलेल्या ‘यू टाईप’ रस्त्यांच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या गेल्या .

उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील वर्दळीच्या शहाड उड्डाणपूल रुंदीकरणाची निविदा जाहीर करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण तातडीने करण्याच्या सूचना उल्हासनगर मनपा आयुक्तांना देण्यात आल्या .

उल्हासनगर मनपा क्षेत्रातील प्रमुख ७ रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येवून ही कामे त्वरीत पूर्ण करण्यासाठी सुचना करण्यात आली .

कल्याण फाटा उड्डाणपूल आणि ऐरोली काटई फ्री वे या प्रकल्पांसाठी वेगाने जागा अधिग्रहीत करण्याची सूचना केली.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त मुद्गल, अतिरिक्त महानगर आयुक्त मनुज जिंदाल, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, उल्हासनगर महापालिका आयुक्त जमीर लेंग्रेकर, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विधानसभा प्रमुख प्रशांत काळे, शहर प्रमुख निलेश शिंदे, माजी नगरसेवक नवीन गवळी, अरुण आशान, राजेंद्र चौधरी, वामन म्हात्रे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.