बदलापूर पश्चिम बॅरेज रोड चौकात होणाऱ्या वाहन कोंडी मुळे वाहनचालक त्रस्त,,, वाहतूक पोलीसांच दुर्लक्ष,,
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनाच दुर्लक्ष

बदलापूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्या मुळे वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने वाहन कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे, वाहतूक पोलीस विभागाकडुन देखील यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने वाहनचालकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या विरोधात तिव्र नाराजी व्यक्त केली आहे,
बदलापूर पश्चिम बॅरेज रोड चौकात सातत्याने होत असलेल्या वाहन कोंडी मुळे,वाहन चालक तसेच नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत, बदलापूर पश्चिम बाजारपेठ ते बॅरेज रोड चौकात सातत्याने सायंकाळी पाच ते रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात लांबचलांब वाहनांच्या रांगा लागत असुन या ठिकाणी वाहतूक शाखेकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने वाहनचालक आणि नागरीकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस किंवा इलेक्ट्रॉनिक सिन्गल व्यवस्था करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे, या परिसरातील लोकप्रतिनिधी देखील अनेक वेळा या वाहन कोंडी मध्ये सापडत असताना देखील या कडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे,