ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासना नंतर जुन्या पेन्शन साठीचे राजपत्रित अधिकाऱ्यांचे आंदोलन स्थगित,,

जून्या पेन्शनच्या मागणी साठी कर्मचारी संघटनांनी दिनांक १४ मार्च २०२३ पासून नियोजित बेमुदत सपांच्या पाश्र्वभूमीवर राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने देखील १३ मार्च २०२३ रोजी पासून बेमुदत संपात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला होता,१ नोव्हेंबर २००५ नंतर राज्य सभेत रुजू झालेल्या तब्बल ५५ टक्के अधिकारी व कर्मचारी यांना भांडवली बाजाराशी संबंधित नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली असून सेवानिवृत्त अथवा सेवाकालावधितच मृत्यू पावलेल्या अशा कर्मचारी यांना अत्यंत तुटपुंजे लाभ मिळत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास आले, असुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परतावा याची हमी नसलेल्या पेन्शन योजने मुळे नवीन पेन्शन धारक भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत चिंतेत असुन जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्यावर राज्यात उग्र आंदोलन करण्याची परिस्थितीत निर्माण झाली आहे, नियोजित आंदोलना स़दर्भात राज्याचे मा, मुख्य सचिव श्री मुनकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक २०/३/२०२३ रोजी पुनश्च अधिकारी महासंघाच्या समवेत बैठक पार पडली व त्या नंतर आजच दुपारी २ वाजता मा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी विधानभवनात झालेल्या बैठकीत जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाणे लागु करण्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली,सदर चर्चेत मुख्यमंत्री महोदयांनी जुन्या पेन्शन बाबत राज्य सरकारने दिनांक १४ मार्च २०२३ रोजीच समिती गठीत केली असून त्याचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून घेण्याचे आश्वासन दिले, तसेच या संदर्भात जुन्या पेन्शन योजने प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षेची हमी देण्याचे धोरण तत्व म्हणून राज्य शासन मान्य करत असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे,

मा, मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील गारपीट परिस्थितीती व आणि विस्कळीत आरोग्य व्यवस्था लक्षात घेऊन नियोजित आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे, राज्य सरकारने दिलेले लिखित आश्वासन व मा, मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने नियोजित केलेले बेमुदत आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समिर भाटकर,मुख्य सल्लागार ग,दी,कुलथे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे,
विधानसभा भवनात संपन्न झालेल्या बैठकीत शासनाच्या वतीने मुख्य सचिव यांच्यासह अपर मुख्य सचिव वित्त विभाग श्री मनोज सैनिक, अपर मुख्य सचिव सेवा श्री नितीन गंद्रे, मुख्यमंत्री यांचे अपर सचिव श्री भुषण गगरानी,, सचिव सा,वि,स, श्री सुमंत भांगे, तर महासंघाच्या वतीने संस्थापक व मुख्य सल्लागार श्री ग दी कुलथे, अध्यक्ष श्री विनोद देसाई, सरचिटणीस समिर भाटकर,कायम निमंत्रित श्री रविंद्र धोंगडे, राज्य संघटक सुदाम टाव्हरे,व ईतर पदाधिकारी उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.