राजकीय
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मुंबई प्रदेश जनसंपर्क कार्यालयाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न*

मुंबई ( प्रतिनिधी ):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश जनसंपर्क कार्यालयाचे खेरवाडी बांद्रा येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.संपूर्ण मुंबई प्रदेश मध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात जोमाने वाढत आहे.रिपब्लिकन चळवळ मजबुतीसाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष कायमच अग्रेसर असून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मुंबई प्रदेश कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सदैव तत्पर असेल असेही प्रतिपादन यावेळी अण्णासाहेब कटारे यांनी केले.
कार्यालयाच्या उदघाटना प्रसंगी पक्षाचे *राष्ट्रीय प्रवक्ते गिरीशजी अकोलकर, केंद्रीय महासचिव पोपटराव सोनवणे, युवा नेतृत्व बिपीन कटारे, महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख तथा मुंबई प्रदेश महासचिव सचिनभाऊ नांगरे, मुंबई प्रदेश अध्यक्षा (महिला आघाडी) शम्मो दीदी खान, नाका मजदूर सेल मुंबई अध्यक्ष सागर भाई पिल्ले, रिक्षा युनियन अध्यक्ष मेहमूद भाई शेख, मानखुर्द- शिवाजी नगर तालुका अध्यक्ष विश्वासराव कांबळे, युवा नेते प्रशांत कटारे, युवा आघाडी सदस्य हितेशभाऊ भालेराव, तिसगाव कल्याण युवा आघाडी सुमित मर्चंडे, बांद्रा अशोक गवई, बांद्रा रमेश पारवे,* आदी उपस्थित होते.