राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांची इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला कामकाज आढावा भेट…*

मुंबई ( प्रतिनिधी ): राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी इंदू मिल दादर येथे भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला कामकाज आढावा भेट दिली. सर्व कामाचा आढावा अण्णासाहेब कटारे यांनी प्रत्यक्षात भेट देऊन तेथील स्थानिक कर्मचाऱ्यांची कामकाजाचा आढावा घेतला. लवकरात लवकर स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन स्थानिक इंजिनियर यांनी अण्णासाहेब कटारे यांना दिले. इंदुमिल येतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम अतिशय जलद गतीने सुरू आहे. लोकांनी कोणत्याही प्रकारचा इंदू मिल स्मारकाबद्दल गैरसमज करून घेऊ नये व कोणत्याही प्रकारचं चुकीची कमेंट्स आपण पोस्ट करू नये. शासनाच्या वतीने जो प्लॅन दिला आहे त्याच प्लॅनच्या नुसार सर्व कामकाज व्यवस्थितपणे करण्यात येत आहे. त्यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी केली. लोकांमध्ये असलेले इंदू मिलच्या बाबत गैरसमज त्यांनी प्रचार माध्यमांशी बोलताना दूर केले. या स्मारकाच्या भेटीदरम्यान राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय महासचिव पोपटराव सोनवणे, राष्ट्रीय प्रवक्ते गिरीजी अकोलकर, युवा नेते / युवा नेतृत्व बिपिन भाई कटारे, महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख तथा मुंबई प्रदेश महासचिव सचिन भाऊ लक्ष्मण नांगरे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अशोकराव भोगले, युवा नेते प्रशांत कटारे आदी युवा कार्यकर्तेच्या उपस्थितीत होते..