पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिनच महिन्यांपुर्वी लोकार्पण करण्यात आलेल्या “अटल सेतु” पुलाची दुरावस्था,, कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांच्याकडुन पाहणी
"अटल सेतु "पुलाला मोठ्या प्रमाणात भेगा

कॉंग्रेस पक्षाच्या आंदोलनाचा भाग म्हणून भाजपा सरकारचा भ्रष्टाचार कारभार ऊघड करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तिनच महिन्यांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या “अटल सेतु “या पुलाची पाहणी केली असता या पुलाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्याचे निदर्शनास आले,
या मुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, नुकताच बिहार मध्ये नवीनच बांधलेला पुल कोसल्याची घटना ताजी असतानाच मुंबई मधिल हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सरकारच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,सदरची बाब अतिशय गंभीर असून उच्च न्यायालयाने या बाबत सुमोटो दाखल करुन चौकशी करावी अशी मागणी नाना पाटोले यांनी केली आहे,
या वेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते श्री मदन जाधव, सचिव श्री रमाकांत म्हात्रे, श्री रामविजय बुरुंगुळे आदी मान्यवर उपस्थित होते,