एस एस टी महाविद्यालयात कोविड बुस्टर डोस कॅम्प संपन्न*

उल्हासनगर ४ मधील एस एस टी महाविद्यालयात बदलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र आशाळे यांच्या सहकार्याने कोविड बुस्टर डोस लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.ज्या विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नव्हते त्यांच्यासाठी एस एस टी महाविद्यालयामध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
याआधी १८ वर्षांवरील सर्वांसाठी तसेच, १५ वर्षांवरील महाविद्यालयातील वि्यार्थ्यांसाठी देखील कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. त्या मोहीमे अंतर्गत विद्यार्थी, शिक्षक, इतर कर्मचारी, आणि नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला होता आणि आता त्या नंतर ज्या विद्यार्थ्यांचे आणि इतर सर्वांचे दोन डोस झाले आहे मात्र बुस्टर डोस बाकी आहे किंवा पहिला डोस झाला आहे दुसरा डोस बाकी आहे अशा सर्वांसाठी एस एस टी महाविद्यालयात आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पार पडले. या वेळी १५० विदयार्थी, शिक्षक, इतर कर्मचारी आणि नागरिकांनी कोवी शिल्ड लसीचा लाभ घेतला.
या लसीकरणासाठी विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळाला.हे लसीकरण यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पुरस्वानी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे उपप्राचार्य, एन.एस.एस चे ठाणे जिल्हा समन्वयक प्रा जीवन विचारे , एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा अनिल तेलिंगे, प्रा योगेश पाटील , प्रा मयूर माथूर आणि एन एस एस स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले आणि बदलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र आशाळे येथील डॉ प्रशांत कनोजा,डॉ.हुसेन सय्यद, श्री जितेंद्र लादवंजारी, परिचारिका मंदा डांगे आणि आशा वर्कर विद्या सुतार ,सुनीता भोईर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.