ताज्या घडामोडी

रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्था बदलापूरची सभा उत्साहात संपन्न.

बदलापूर दिनांक १५/०८/२०२२: रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्था बदलापूर यांची सभा कार्यकारणी व संचालक मंडळाची सभासदांची सभा उत्साहात पार पडले सदर सभेस संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश महाजन यांनी सभेच्या सुरुवातीला कोरोना काळात आज पर्यंत जे सहप्रवासी या महामारी मध्ये मृत पावले त्यांच्या आत्म्यास शांतीसाठी श्रद्धांजली चा ठराव घेतला व उपस्थित सर्व सभासद पदाधिकारी व प्रवासी मित्र यांनी दोन मिनिटं जागी उभे राहून सर्व ज्ञात अज्ञात मृत आत्म्यास शांती लाभो यासाठी श्रद्धांजली वाहिली त्याचबरोबर श्री महाजन यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये संस्थेच्या ध्येय आणि धोरणे याबाबत सविस्तर माहिती सांगितली. रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्था ही सन २००८ला नोंदणी कृत करण्यात आले असून सदर संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे आपल्या रेल्वे प्रवाशांच्या मदतीला धावून जाणे व त्यांना योग्य ती मदत करणे हे आहे संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून असंख्य कामे केली जातात प्रवाशांना होणाऱ्या दैनंदिन त्रासाबाबत आपण प्रशासनाशी योग्य त्या प्रकारे चर्चा करून विषय मार्गी लावू आणि जर चर्चा करून प्रवाशांना योग्य त्या सुविधा मिळत नसतील तर आपणास कठोर पावले उचलून आपले हक्क हिसकावून घ्यावे लागतील बदलापूर मध्ये असणारी रेल्वे सुविधा ही खूप खूप अपुरी आहे त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होत आहे या सर्वावरती उपाय म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन आपले म्हणणे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याकरिता आपल्या सर्वांची मदत हवी आहे आपण करत असलेले काम हे निस्वार्थ व आपलेपणाने करणे गरजेचे आहे त्याकरिता आपणास जे जे काही करायला लागेल तेथे आपण सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे आहे. आपल्या सर्वांची जर साथ असेल तर प्रत्येक रेल्वे प्रवाशाचे दुःख आपण कमी करू शकतो तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनाशी चर्चा करून प्रत्येक गोष्ट तडीस नेऊन प्रवाशांना सुखी करू शकतो त्याकरता फक्त आपल्या सर्वांची सहकार्याची भावना हवी. त्याच्यानंतर राजेंद्र नरसाळे यांनी आपले मनोगत मनोगत व्यक्त करताना प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत अनेक सुविधा चा अभाव या सर्व गोष्टी वरती सविस्तर मांडणी केली प्रवाशांना त्याचा हक्क मिळालाच पाहिजे त्या अनुषंगाने आपण सतत काम करत राहू असं त्याने आपल्या भाषणात सांगितले. त्याच्यानंतर संस्थेच्या सहसचिव सौ.अशा लता पोद्दार यांनी आपले मनोगत व्यक्त केले


प्रवासात एकजुटीची काय ताकद असते त्याबाबत त्याने आपले अनुभव कथन केले तर नंतर संस्थेचे विशेष कौतुक केले. त्यानंतर श्री दिलीप चौकवाले याने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच श्री बबन घोलप साहेब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच पत्र गुरुनाथ हलपतराव यांनी एकजुटीचा फायदा कसा आहे याबाबत केले. रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश महाजन यांनी उपस्थित प्रवासी सहकारी मित्र यांना आपण सभासद होऊन संघटनेचे ताकद वाढवण्यासाठी सहकार्य करावे आपले सामाजिक बांधिलकी समजून निस्वार्थपणे रेल्वे प्रवाशांची सेवा करण्याकरिता प्रशासनाबरोबर आणि स्थानिक पातळीवरती जे चांगले प्रयत्न करता येतील ते करूया संघटनेच्या पदावरती काम करण्याची ज्या सभासदांना इच्छा आहे त्या सभासदांना शक्यतो संधी देण्यात येईल आणि संघटनेची वाढ करता येईल संघटना रेल्वे प्रवासी सहकार्य मित्र संस्था ही थोड्याच दिवसात सर्व प्रवाशांना सभासद करून घेण्याकरिता स्टेशन वरतीच सभासद नोंदणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे त्यावेळी सर्व प्रवाशांनी आपले सभासद अर्ज भरून संस्थेकडे सादर करायचे आहेत अशा सूचना दिल्या नंतर उपस्थितांचे आभार मानण्याकरिता माननीय राजेंद्र नरसाळे यांनी आभार प्रदर्शन केले सदर सभेस श्री रमेश महाजन अध्यक्ष, दिलीप राजे कोषाध्यक्ष, सौ आशालता पोद्दार सहसचिव ,बबन घोलप , आनंद सोरटे , कांतीलाल गंभीराव, राजेश तांबे, संजय गुरव, दिलीप चौकवाले, गुरुनाथ हलपतराव तसेच प्रवीण शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.