बदलापूर मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार २१ ऑगस्ट २०२२ रोजी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन,,,

बदलापूर !! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कुळगाव बदलापुर शहरा मध्ये भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी बदलापुर पुर्व संजिवनी हॉल रेल्वे स्थानका समोर या ठिकाणी सदरच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे मेळाव्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधित करणार आहेत, या मध्ये बदलापुर मधिल शिवसेना पदाधिकाऱ्यांसह युवासेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यां, लोकाधिकार समिती पदाधिकारी, वाहतूक सेना पदाधिकारी व शिवसेनेच्या संलग्न असलेल्या सर्व संघटना या मेळाव्यात सहभागी होणार असल्याचे संयोजकां कडून सांगण्यात आले आहे, मेळाव्यात आगामी होणाऱ्या कुळगाव बदलापुर नगरपालिकेच्या निवडणुकी बाबत रणनिती आखली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, या वेळी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे हे शिंदे गटा बरोबर गेले असल्याने कदाचित नवीन शहर प्रमुखाची घोषणा होण्याची शक्यता आहे, या मध्ये बदलापुर मधिल निष्ठावंत शिवसैनिकांची बदलापुर शहर शिवसेनेच्या नवीन कार्यकारिणी मध्ये वर्णी लागली असल्याचे समजते, मेळाव्यात मोठ्या प्रमाणात सामिल होण्याचे आवाहन ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी केले आहे, या नंतर आता, बदलापुर मध्ये शिवसेनेचे दोन गट एकमेका समोर ऊभे ठाकणार असुन या दोन गटांतील संघर्षाचा फायदा नक्की कोणाला होईल हे येत्या होणाऱ्या बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत बघायला मिळणार आहे,