राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेची संधी असताना डॉ सुरेश राठोड यांची माघार*

कोल्हापूर :विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणुन संधी असताना कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश राठोड यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या या अनपेक्षित पावित्र्याचे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
डॉ सुरेश राठोड यांनी सामाजिक, शैक्षणिक व पत्रकार क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी केल्याने येथील अनेक संस्था संघटना व फौंडेशन यांनी त्यांच्या सारख्या व्यक्ति विधानपरिषदेत हव्यात म्हणुन पाठपुरावा केला होता. यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री व राज्यातील जेष्ठ नेत्यांना तसे साकडे घातले होते. डॉ राठोड यांना विधानपरिषदेवर संधी देऊन त्यांचा गौरव करावा यासाठी मान्यवरांच्याकडे शिफारस पत्रे धाडली होती, शिष्टमंडळानेही मुख्यमंत्री, राज्यपाल यांचेकडे तशी शिफारस केली होती. यासाठी दिल्ली, मुंबई येथुन सुध्दा नेतेमंडळी कडुन त्यांच्या नावाचा आग्रह धरला जात होता.
डॉ राठोड यांची चर्चा चालू असताना अचानक खळबळजनक बातमी समोर आली आहे की, डॉ राठोड यांनी विधानपरिषद निवडणुकीतुन माघार घेत मला राजकारण नाही तर समाजकारण करायचे आहे असे शब्द उध्दारत मी स्वत: राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे मी इच्छुक नसल्याचे कळवले आहे व इच्छुक सामाजिक कार्यकर्ते यांना विधानपरिषद सदस्या साठी जाहीर पाठींबा देणार आहे असे म्हणाले.
जनता हीच माझी खरी ताकद आहे. यापुढे माझ्या सामाजिक संघटनेला मी बळकट करणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांना आदर्श मानत डॉ. राठोड यांनी राजकारण नाही तर समाजकारणामध्ये आपली आवड असल्याचे मत व्यक्त करत त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आणि युवकांना संघटीत करणार, असा निर्धार डॉ सुरेश राठोड यांनी केला आहे. मागील १० वर्षात मी जनतेसाठी अहोरात्र काम केले आहे. यापुढेही अधिक बळकटीने हे काम पुढे नेणार असल्याचे डॉ.राठोड म्हणाले आहेत.