
तहसीलदार कार्यालय करवीर मध्ये विविध कामांसाठी रोज शेकडो अर्ज येत असतात. या अर्जावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ निर्णय घ्यावा, हा त्यामागचा मुख्य हेतू असतो.
राज्यभरात सर्वच तहसील कार्यालयाचे काम संगणकीय प्राणालीमुळे गतिमान झाले असले तरी करवीर तहसील मध्ये मात्र अधिकाऱ्यांचा हलगर्जपणा आणि बेशिस्तपणामुळे या कामांना खिळ बसली आहे. विविध भागातून येणाऱ्या अर्जांच्या कामाची छाननी
टपाल विभाग करतो.मात्र येथे स्वतंत्र लिपिक नसल्याने अनेक वेळा अर्ज केवळ स्वीकारण्यासाठी अर्धा ते एक तास बसावे लागते.येथे बसण्याची देखील सोय नाही. आलेले अर्ज दोन ते तीन दिवस संबधित लिपीककडे जात नाही. त्यामुळे नागरिकांची कामे ठप्प होतात. अनेक अर्ज गहाळ होतात. अर्जा सोबत जोडलेली कागदपत्रे हजारो रुपये खर्च करून व बराच मनस्ताप करून उपलब्ध केलेली असतात. हे अर्ज संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचतील की नाही याचीही खात्री देता येत नाही. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होत आहे. तहसीलदार करवीर,जिल्हाधिकारी कोल्हापूर येथे स्वतंत्र नियमित टपाल लिपिक भरतील का? अशी विचारणा नागरिकांनी केले आहे.