श्यामदादा गायकवाड यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात विविध ठिकाणी तहसील कार्यालयांवर आर.पी.आय सेक्युलर पक्षाचा निषेध मोर्चा*

संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना देशाची मान शर्मेने खाली घालण्याचा प्रकार राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सुराणा या गावात घडला आहे. जे शिक्षक मुलांना शिक्षण देऊन या देशाचं भविष्य घडवित असतात त्यातीलच एका जातीवादी मानसिकतेच्या छलराम नावाच्या शिक्षकाने शाळेच्या मटक्यातील पाणी प्यायल्याने एका ८ वर्षीय दलित समाजाच्या इंद्रपाल मेघवाल नामक विद्यार्थ्यास मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे त्या निष्पाप जीवाचा मृत्यू झाला.मोदी शासन देशात सत्तेत आल्यापासून जातीयवादी मानसिकतेचे धर्मांध आतंकवादी असे हजारो हत्याकांडच करत आहेत. देशातील दलित-आदिवासी, धार्मिक अल्पसंख्यांकांवर हल्ले होत आहेत. या धर्मांध लोकांपासून कोणीच सुरक्षित नाहीत.
अशा जातीयवादी घटनांना तात्काळ आळा बसावा. व हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून इंद्रपाल मेघवाल या विद्यार्थ्याचा खून करणाऱ्या शिक्षकाला फाशी द्यावी. ही प्रमुख मागणी घेऊन महाराष्ट्रातील तहसील कार्यालयांवर निषेध मोर्चा चे आंदोलन करण्याचे आदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे मार्गदर्शक नेते श्यामदादा गायकवाड यांनी दिले.
श्यामदादा यांनी दिलेल्या आदेशानुसार मुंबई, पुणे,नाशिक, अमरावती,अकोला, नागपूर, पालघर वसई, घाटकोपर विक्रोळी, मुलुंड मुरबाड,अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी सह अनेक ठिकाणी निषेध मोर्चा चे आंदोलन करण्यात आले.