राजकीय

वंचित बहुजन आघाडी व एमआयएमच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई, दि. ५ सप्टेंबर

वंचित बहुजन आघाडी व एमआयएम पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार उपस्थित होते.

काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून काँग्रेस पक्षच सर्व समाज घटकांना न्याय देऊ शकतो याचा विश्वास असल्यानेच आज एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करा व पक्ष संघटन बळकट करा असे आवाहन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षाचे स्वागत केले.

काँग्रेसमध्ये प्रदेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये, वंचित बहुजन आघाडी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शाकीर इंसालाल तांबोळी, सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव उमर फारूक काकमरी, सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष फारूक अब्दुलरहमान पटणी, एमआयएमचे इस्लामपूर (जि सांगली) शहराध्यक्ष एजाज मुजावर, एमआयएमचे इस्लामपूर तालुकाध्यक्ष जाकिर मुजावर, वंचित बहुजन आघाडीचे नौशाद तांबोळी, मौला नदाफ, दिलावर तांबोळी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.