जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हापरिषद डोहोळेपाडा शाळेत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न*

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा ,केंद्र कोशिंबी,ता. भिवंडी जि. ठाणे येथे दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा वह्यावाटप कार्यक्रम संपन्न झाला.
शाळेच्यावतीने संस्थेच्या सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सहशिक्षक तथा कास्ट्राईब कोकण विभाग उपाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमा विषयी गौरवोद्गार काढून शिक्षक अशोक गायकवाड यांनी संस्थेच्या विधायक कार्याला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले
शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण 64 विद्यार्थ्यांना 170 वह्या उपस्थित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या*
यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी प्रा.निवृत्ती मगर सर,राजाराम भोईर,केतन ठाकरे,देऊ महाराज पालवी,रोहिणी पाटील, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे,मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख व विद्यार्थी उपस्थित होते.