राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक रोड शहर संघटक तथा दिंडोरी तालुका प्रभारी पदी आकाश गांगुर्डे यांची निवड

नाशिक(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक रोड शहर संघटक पदी व दिंडोरी तालुका प्रभारी पदी आकाश गांगुर्डे यांची
*राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे*
यांनी निवड जाहीर करून त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र देखील प्रदान केले.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अत्यंत जोमाने वाटचाल करीत असून दररोज कार्यकर्त्यांचा फौज-फाटा मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन त्यांच्या कामकाजाला कार्याला प्रभावित होऊन अनेक दिग्गज नेते कार्यकर्ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दररोज प्रवेश करीत आहेत.
*जसंपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने “we are republican”(आम्ही रिपब्लिकन* हे
समाज जोडो अभियान गतिमान केले असून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सतत गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मैदानात उतरला आहे.
आकाश गांगुर्डे यांचा नाशिक रोड परिसरात दांडगा जनसंपर्क असून पक्ष वाढीसाठी अतोनात प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दिंडोरी तालुक्यात देखील आकाश गांगुर्डे यांचा जनसंपर्क उत्तम असून त्यांची पक्षाने दिंडोरी तालुक्याचे प्रभारी म्हणून देखील निवड केली आहे.
आकाश गांगुर्डे यांच्या निवडीमुळे नाशिक रोड परिसरातून दिंडोरी तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे व शुभेच्छा देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत.
निवडी प्रसंगी
*राष्ट्रीय प्रवक्ते गिरीशजी अकोलकर सर, महाराष्ट्र प्रदेश महासचिव एडवोकेट विजयजी पवार, ज्येष्ठ नेते नंदकुमार जोशी*
आदी पदाधिकारी उपस्थित होते