जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले यांचा कोशिंबी शिक्षक वृंदाचे वतीने शिक्षण परिषदेत सत्कार

कोशिंबी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हापरिषद शाळा डोहोळे,केंद्र कोशिंबी,ता.भिवंडी येथे शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी संपन्न झाली. यावेळी जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भिवंडी संजय अस्वले यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर योग स्पर्धेत निवड झाल्याबद्दल कोशिंबी केंद्रातील शिक्षकांचे वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
योगा कल्चर असोशियसन ठाणे / महाराष्र्ट्र यांच्या संयोजनातुन जिल्हास्तरिय व राज्यस्तरीय योगस्पर्धा माहे नोव्हेंबर 2021 व फेब्रूवारी 2022 मध्ये घेण्यात आल्या होत्या.सदर स्पर्धामध्ये वयोगट 55ते 65या वयोगटात संजय अस्वले यांनी सहभाग घेऊन क्रमांक पटकविला.त्यानंतर राष्र्ट्रिय स्तरावर मे 2022 मध्ये औरंगाबाद येथे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धांमध्ये संजय अस्वले यांनी आपली प्रतियोगिता सादर करुन त्यांची निवड आंतरराष्र्ट्रिय स्तरावर झाली . संजय अस्वले शालेय विद्यार्थी वयोगटात सातत्याने दोन वर्षे कुस्ती खेळात राज्य स्तरावर सेमी फायनल पर्यंत मजल मारली आहे.
संजय अस्वले हे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून जिल्हा परिषद ठाणे .पंचायत समिती ,भिवंडी येथे कार्यरत आहेत,
त्यांची शिक्षण विस्तार अधिकारी
म्हणून 26 वर्षे सेवा आहे. यामध्ये पंचायत समिती मुरबाड, अंबरनाथ,जिल्हा परिषद ठाणे,उपशिक्षणाधिकारी, अधिक्षक, शा.पो.आ.,गटशिक्षणाधिकारी ,
गटसमन्वयक अशा विविध पदावर यशस्वी काम केले आहे.
संगीत ,कला,क्रिडा ,काव्यलेखन , योगाअभ्यास यामध्ये त्यांना विशेष आवड आहे,प्रशासनात त्यांचे कामकाज देखील चांगले आहे.
एक अष्टपैलु व्यक्तिमत्व संजय अस्वले शिक्षकांजवळचे नाते आहे,त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या,