बदलापूर रेल्वे प्रवासी सहकारी संस्थेच्या माध्यमातून विजयादशमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

बदलापूर! सालाबादप्रमाणे या वर्षीही दिनांक ५ आक्टोंबर २०२२ रोजी येणाऱ्या दसरा म्हणजेच विजयादशमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश महाजन यांनी दिली आहे, या निमित्ताने विजयादशमीचे औचित्य साधून दिनांक ४ आक्टोंबर रोजी सकाळी सकाळी ६:३० ते १० वाजेपर्यंत प्रवाशां बरोबर संवाद साधला जाणार असून याच दरम्यान बदलापुर स्टेशन मधुन सुटणाऱ्या लोकल गाड्यांची पुजा करण्यात येणार आहे, या निमित्ताने मोटरमन, गार्ड, स्टेशन प्रबंधक, रेल्वे सुरक्षा रक्षक, रेल्वे पोलिस, पत्रकार अग्निशमन दलाचे अधिकारी यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात येणार आहे, तसेच १ आक्टोंबर २०२१ ते ३० संप्टेंबर २०२२ या काळात सेवा निवृत्त होणार असलेल्या प्रवाशांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे, या साठी सेवानिवृत्त होणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी संस्थेच्या ८१०८१५७०७८/९८२२०५९३६६ या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन श्री रमेश महाजन यांनी केले आहे,