राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष जळगाव नेऊर व नेऊरगाव शाखेंचे अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते उद्घाटन

येवला(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात पाहता संपूर्ण महाराष्ट्रातून दररोज असंख्य कार्यकर्ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश करीत आहेत.
*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष येवला तालुक्याच्या वतीने जळगाव नेऊर गाव व नेऊरगाव या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या फलकाचे अनावरण राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते करण्यात आले.
व दोन्ही ठिकाणी भव्य प्रमाणात सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या येवला तालुक्यात गाव तिथे शाखा निर्माण होत असून त्या अनुषंगाने येवला तालुक्यातील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे युवा कार्यकर्ते महिला जोमाने कामाला लागले आहे.
यावेळी जळगाव नेऊर व नेऊरगाव यांच्या वतीने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची भव्य रॅली काढण्यात आली त्यानंतर रॅलीचे स्वरूप सभेत झाले.
या सभेत गावातील महिला ,ज्येष्ठ नागरिक ,युवक ,युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उद्घाटनाप्रसंगी
*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय प्रवक्ते गिरीशजी अकोलकर सर, युवा नेतृत्व बिपिन अण्णासाहेब कटारे ,महाराष्ट्र महासचिव एडवोकेट विजय पवार ,महाराष्ट्र जनसंपर्कप्रमुख सचिन भाऊ नांगरे ,येवला शहराध्यक्ष विजय भाटे ,युवा नेते प्रशांत कटारे*
उपस्थित होते
कार्यक्रमाचे नियोजन
*येवला युवा नेते तुषार भाऊ वाघ ,येवला तालुका संघटक बबन भाऊ वाघ, जळगाव नेऊर शाखा अध्यक्ष-कैलास वाघ, उपाध्यक्ष वाल्मीक खरात,नेवरगाव शाखा अध्यक्ष अविनाश जगताप,उपाध्यक्ष नरेंद्र गांगुर्डे, किरण वाघ, सचिन गांगुर्डे,अविनाश गांगुर्डे,प्रसाद गांगुर्डे,रावसाहेब वाघ ,अरुण वाघ, तोसिफ शेख, ऋतिक वाघ, चंदू वाघ ,शंकर वाघ,वैभव गांगुर्डे,देवेंद्र गांगुर्डे,विजय गांगुर्डे, साईनाथ आहिरे, दीपक वाघ, समीर वाघ, गणेश वाघ, राहुल घुसळे ,पवन सोनवणे ,राहुल वाघ, नितीन वाघ ,योगेश वाघ, यश वाघ,धनंजय गांगुर्डे,विकास गांगुर्डे,राहुल गांगुर्डे*
आदी पदाधिकारी यांनी केले होते