ठाणे शहरातील परेरा नगर रहिवासी नवरात्रौत्सव मंडळा तर्फे नवरात्रौत्सव उत्साहात साजरा.

ठाणे दि 1. ठाणे शहर जिल्ह्यातील लोकमान्य नगर परेरा नगर या भागातील परेरा नगर रहिवासी नवरात्रौत्सव मंडळ आर, पी, आय, नेते जितेंद्रकुमार इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 26/9/2022 रोजी दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना परेरा नगर नवरात्रौत्सव मंडळने ढोल, ताशा, लेझीम, सांस्कृतिक, परंपरेने व नगरातल्या रहिवाशांच्या माध्यमातून दुर्गा मातेची मूर्ती स्थापना केलीअसून, देवीची, आरती, विविध, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, उपक्रम गेल्या चार ते पाच दिवसापासून मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत.तरीही विभागातील सर्व समाजातील व्यक्तींनी आपापसात असलेले राग द्वेष, भांडणे विसरून एकत्र यावेत. व विभागातील सामाजिक सलोखा, प्रेम वाढीस लागावा या दृष्टी कोणातून परेरा नगराचे संस्थापक स्वर्गीय जगदीश (आप्पासाहेब) इंदिसे यांनी इस 1996 साली परेरा नगर रहिवाशी नवरात्रौत्सव मंडळची स्थापना केली, व त्यांच्याबरोबर आप्पासाहेब यांच्या चिरंजीव संजय (आबा) ज, इंदिसे हे देखील आप्पासाहेबांनी सुरू केलेल्या परेरा नगर रहिवासी नवरात्रौत्सव मंडळात सहभागी होऊन सहकार्य करत असे परंतु दुर्दैवाने काही काळा नंतर संजय (आबा) इंदिसे हे मृत्यू पावले व त्यानंतरच काही वर्षांनी परेरा नगराचे संस्थापक आप्पासाहेब इंदिसे देखील दुर्दैवाने मृत्यू पावले व विभागातील सामावून घेतलेल्या आपुलकीला तुटवता पडू नये हे विचारसरणी घेऊन आर,पी,आय, नेते जितेंद्रकुमार इंदिसे यांनी आपल्या हाती परेरा नगर रहिवासी नवरात्रौत्सव मंडळची दोरी घेतली व ती आजपर्यंत घेतलेले जबाबदारी निस्वार्थपणे आपुलकीने जपत आहे,
त्यांच्या ह्याच कार्याला परेरा नगरातील अनेक तरुणांनी हातभार लावला खेळत असलेल्या आपल्या माता, भगिनींना, बंधू, यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न हो याची देखील दक्षता परेरा नगर रहिवासी नवरात्रौत्सव मंडळ व अमोल पेंढाणकर,रामा सिंग, ऋषी इंदिसे राहुल ढाके, सुदोधन मुख्यदल,
सिद्धार्थ मोरे,साहिल खरात,
विनोद जाधव,जयवंत भवार,
सरोज सिंग,अर्जुन पंडित,
शुभम वाघमारे,विशाल गुप्ता. हे पदाधिकारी घेत आहे