बदलापूर शहर शिवसेना प्रमुख किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली बदलापुर पश्चिम परिसरातील पाणी समस्ये बाबत प्राधिकरणाला निवेदन,,,,.

बदलापूर! बदलापूर पश्चिम परिसरात गेले अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, या परिसरात सातत्याने कमी दाबाने येत असलेल्या पाणी पुरवठ्या मुळे या परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत, बदलापुर पश्चिम मोहनानंदनगर,मांजर्ली,लॅंडब्रिज या परिसरातील पाण्याच्या समस्ये बाबत नागरिकांनी अनेक वेळा प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या आहेत, परिसरातील लोकप्रतिनिधी यांच्याकडे देखील अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, परंतु या बाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे,याच पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन बदलापुर शहर शिवसेना प्रमुख श्री किशोर पाटील यांनी शहर संपर्क प्रमुख प्रशांत पालांडे, आणि उपशहरप्रमुख तसेच शहर सचिव आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यासह बदलापुर प्राधिकरणाच्या प्रमुख सौ पाटील मॅडम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले असून तातडीने ही पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली आहे, या वेळी सौ पाटील मॅडम यांनी या बाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती शिवसेना उपशहरप्रमुख गिरीश राणे यांनी दिली आहे,