आपला जिल्हा

बदलापूर पश्चिम बाजारपेठेतील अनाधिकृत गाळ्यांवर कारवाई करणेसाठी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे दिनांक १ नोव्हेंबर २०२२ पासून बेमुदत लाक्षणिक साखळी उपोषण

कुळगाव बदलापुर पश्चिम बाजारपेठेतील अनाधिकृत गाळ्यांवर कारवाई करणेसाठी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने दिनांक १ नोव्हेंबर २०२२ पासून लाक्षणिक बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहेत,कुळगाव बदलापुर पश्चिम बाजारपेठेत तळ मजला + एक असे एकूण ३२ गाळे हे बदलापूर नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधण्यात आले आहेत,बाजार पेठेतील या अनाधिकृत बांधकांवर मागील काळात अनेक वेळा अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली असताना अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका प्रशासनाने ठेकेदार तसेच पोलिस बंदोबस्तासाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत,असे असताना पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी बांधकाम होत असेल तर पालिका प्रशासनाला या पुर्वी अतिक्रमण हटवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्याची काय गरज होती? असा सवाल लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रदिप गोविंद रोकडे यांनी ऊपस्थित केला आहे, बाजारपेठेत सुरू असलेल्या या अनाधिकृत बांधकामा बाबत पालिका प्रशासनाला माहिती अधिकारात परवानगी बाबत विचारले असता पालिका प्रशासनाने या गाळ्यांच्या बांधकामाला कोणतीही परवानगी दिली नसल्याचे पालिका प्रशासनाने संघटनेला लेखी पत्र देऊन कळवले आहे, त्या नंतर लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने सदरचे अनाधिकृत बांधकाम तातडीने निष्कासित करण्याची मागणी सातत्याने लेखी निवेदन देऊन केली आहे,

परंतु पालिका प्रशासनाने या बाबत कोणताही दखल न घेता या अनाधिकृत बांधकामाला अभय देण्याचे काम केले आहे, पालिका प्रशासना कडुन कोणतीही परवानगी न घेता राजरोसपणे सुरु असलेल्या या अनाधिकृत बांधकामाला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप संघटनेचे सचिव श्री भरत कारंडे यांनी केला आहे,

सदरचे अनाधिकृत बांधकाम हे रेल्वे रुळाला अगदी लागुनच असुन अपघात होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे, गाळेधारकांनी रेल्वे प्रशासनाची देखील कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे, या मुळे दिनांक १९ आक्टोंबर २०२२ रोजी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रदिप गोविंद रोकडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुळगाव बदलापुर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांची भेट घेऊन सदरच्या अनाधिकृत बांधकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून कारवाई न झाल्यास कुळगाव बदलापुर नगरपालिकेच्या कार्यालया समोर दिनांक १ नोव्हेंबर २०२२ पासून बेमुदत साखळी उपोषणाला बसणार असल्या बाबतचे निवेदन मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांना सादर करण्यात आले आहे, या वेळी कुळगाव बदलापुर पुर्व पोलिस ठाण्यात देखील संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे, निवेदन देताना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रदिप गोविंद रोकडे, प्रदेश सचिव श्री भरत कारंडे, शहर समन्वयक श्री कैलास जाधव, सुधिर गायकवाड,रोषन जाधव,नंदु ईरमाळी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.