आरोग्य व शिक्षण

डोहोळेपाडा शाळेत विद्यार्थी दिवस उत्साहात संपन्न

विश्वरत्न, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर शाळा प्रवेश दिन, विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून *जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा ,केंद्र कोशिंबी भिवंडी येथे सकाळी ठीक 11-30 वाजता विद्यार्थी दिवस कार्यक्रमाचे आयोजन दि.7 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले*

*प्रथम विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला शाळेतील विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले*

सर्व विद्यार्थांनी पुष्प अर्पण करून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले

*विद्यार्थांनो जागृत व्हा* या विषयावर सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले.
तसेच *या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सहशिक्षक अशोक गायकवाड यांचे तर्फे पेन व गुलाब पुष्प देऊन शिक्षणासाठी प्रेरित केले*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी केले.

सहशिक्षिका दिलशाद शेख यांनी आभार व्यक्त करून समारोप केला.

यावेळी मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख व विद्यार्थी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.