राजकीय

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*

कोल्हापूर-डॉ. सुरेश रा inठोड
: कोल्हापूर येथील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील यांची सामाजिक बांधिलकी तसेच समाजाप्रती असणारे प्रेम व बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे कार्यपद्धत जपले आहे. आज पर्यंत त्यांनी प्रत्येक वाढदिवसाला दानधर्म करून सहकार्याचा हात सर्वांना पुढे केला आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. असे व्यक्तिमत्व नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना कोल्हापूर मध्ये नक्कीच बळकट करतील, अशा शब्दात राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आ. राजेश क्षीरसागर यांनी शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गुणगौरव केला.


कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व शिवाजीराव पाटील (सडोलीकर) यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यावेळी कोल्हापुरातील अनेक जनावरांना चारा, गोरगरिबांना फळ वाटप व रात्रीतून वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याचे कार्य शिवसैनिकांकडून करण्यात आले. हाच उपक्रम शिवाजीराव गेले अनेक वर्षे आपल्या वाढदिवसानिमित्त आगळ्यावेगळ्या पद्धतीने करत आले आहेत, त्यामुळे नेहमीच त्यांचा वाढदिवस चर्चेचा विषय असतो. आतापर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पुस्तक, लॅपटॉप व वस्त्र वाटपाचे अनेक उपक्रम राबवले आहेत.

रविवारी साजरा झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, कार्यकारी संपादक डॉ सुरेश राठोड, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख जयवंत हार्वउगले, शिवाजी जाधव, समन्वयक रंजीत जाधव, राजू भूरी, सुभाष सका, तानाजी जाधव, किशोर घाटगे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विभागातील अनेक नागरिक अनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.