संविधान गौरव दिनी ग्रामपंचायत कार्यकारणी व उच्च शिक्षित विद्यार्थी सन्मान सत्कार संपन्न

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा वतीने संविधान गौरव दिनाचे आयोजन 26 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी ठीक 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालय डोहोळे,ता.भिवंडी येथे करण्यात आले.
या गौरव दिनानिमित्त संविधान सन्मान प्रचार रॅली संपूर्ण वाडी वस्तीतून काढण्यात आली.सदर रॅलीत शाळाव्यवस्थापन समिती,ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. सन्मान रॅलीत भारतीय संविनाचा जयघोष करून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कास्ट्राईब कोकण विभागीय अध्यक्ष तथा संचालक ठाणे पालघर शिक्षक पतपेढीचे मा.संतोष गाढेसर होते.
कार्यक्रमाची सुरूवात संविधान निर्माते महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच संविधान प्रतीला पुष्प अर्पून दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
*विद्यार्थी श्लोक मोरे व उपस्थितांनी भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन केले
.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने व पुस्तक,संविधान उद्देशिका व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
*संविधान गौरव दिनानिमित्त ग्रामपंचायत डोहोळे सरपंच छाया हरड मॅडम व कार्यकारणी तसेच उच्च शिक्षित विद्यार्थी वकील, डॉक्टर, इंजिनिअर यांचा संविधान प्रत,संविधान उद्देशिका प्रत व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला. सदर सन्मान सत्कार गृपग्रामपंचायत डोहोळे सरपंच मा.छाया हरड,सदस्य शुद्धोधन जाधव, सदस्या रेश्मा मगर, ग्रामविकास अधिकारी आर बी.वनगा,वरिष्ठ लिपिक एकनाथ जाधव,शिपाई वायरमन गणेश शिंदे,संगणक परिचालक निशा पाटील, केंद्र चालक अनुष्का ठाकरे, उच्च शिक्षित विद्यार्थी अॅड.अंकित जाधव,अॅड.दिनेश हरड,इंजिनिअर संदेश पांडव,डाॅ.जयराज जाधव इत्यादींचा संविधानाची प्रत,उद्देशिका,पुष्पगुच्छ सन्मान सत्कार करण्यात आला.*
हस्ताक्षर स्पर्धा व संविधान उद्देशिका वाचन स्पर्धेत प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थांचा पेन,संविधान उद्देशिका प्रत व गुलाब पुष्प देऊन कौतुक केले.
*संविधान विषयावर प्रबोधनपर व सखोल मार्गदर्शन जिल्हा संघटक कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा ठाणे ग्रामीण प्रवक्त्या ओबीसी संघर्ष समिती ठाणे,सदस्या कुणबी युवती ठाणे मा.साधना भेरे मॅडम यांनी केले. यावेळी त्यानी सांगितले की, मानव मुक्तीचे व मानव कल्याणाचे एकमेव कोणी असेल तर आपले भारतीय संविधान आहे.आणि त्या संविधानाचे शिल्पकार माहामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आहेत हे कोणी विसरू नये*
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी बहारदार शैलीत केले*
*अध्यक्षीय मनोगत संतोष गाढेसर कोकण विभागीय अध्यक्ष कास्ट्राईब यांनी मांडले*
कार्यक्रमाची सांगता आभार मानून राष्ट्रगीताने केली.
सदर कार्यक्रमाला कास्ट्राईब कोकण विभागीय अध्यक्ष तथा ठाणे पालघर शिक्षक पतपेढी संचालक संतोष गाढे सर, जिल्हा संघटक समाजोन्नती संघ मुंबई साधना भेरे मॅडम, गृप ग्रामपंचायत सरपंच छाया हरड मॅडम, कास्ट्राईब कोकण कार्याध्यक्ष दिनेश शिंदे,ठाणे पालघर शिक्षक पतपेढी संचालक ,उद्योजक अशोक ठाणगे सर, ग्रामपंचायत सदस्य शुद्धोधन जाधव, शंभुराजे प्रतिष्ठान डोहोळे अध्यक्ष प्रा.निवृत्ती मगर सर,शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे,माजी अध्यक्ष अशोक म्हसकर, मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड सर, सहशिक्षिका दिलशाद शेख व विद्यार्थी उपस्थित होते.