आपला जिल्हा

भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने संविधान दिन संपन्न.

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधुन सर्वसामान्य वंचित व बहुजनांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणारे संविधानाचे जनक विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना भटके विमुक्त समाजाच्या वतिने देण्यात आली. याप्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, भटके विमुक्तांचे नेते भिमराव ईंगोले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


वंचित व शोषित समाजाचे प्रश्न स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही जसेच्या तसेच आहे याचे दुःख असल्याची खंत भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यानी बोलताना व्यक्त केली.


स्वातंत्र्यापूर्वि इंग्रजानी गुन्हेगारी कायदा लागू करून छळले, स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानी समाज कुठे आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतो असे वाटत असताना विकासाच्या नावाखाली भटके विमुक्त समाजाच्या वस्तीवर अनधिकृत ठरवून कारवाई करण्यात येत असल्याबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.