अनवरभाई शेख यांच्या वाढदिवसाला मित्रपरिवारांनी आणि चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा….*
बदलापूर प्रतिनिधी: कमाल शेख*

आज दिनांक ९ संप्टेंबर २०२२ मा.अनवरभाई शेख यांचा ४४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला असून, त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या विविध क्षेत्रातील मित्रपरिवारांनी शुभेच्छा दिल्या.
मा.अनवरभाई शेख हे खूप मेहनत घेऊन स्वकष्टाने पुढे आलेलं व्यक्तिमत्त्व आहे. आज ते चांगले उद्योजक आहेत.त्यांचा राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात दांडगा जनसंपर्क असून एक चांगली ओळख निर्माण त्यांनी केलेली आहे.समाजातील बांधवांचे अनेक प्रश्न सोडवण्यात ते नेहमी अग्रेसर असतात.शैक्षणिक विषय असो कि एखादा सामाजिक विषय असो असे कोणताही विषय सोडवण्यासाठी ते नेहमी तयार असतात.एक चांगला अभ्यासू मित्रपरिवार त्यांच्या जोडीला असतो.अशा पद्धतीने एक धडाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून आमच्या अनवरभाई कडे पाहिले जाते.
मागील जुन्या आठवणीकडे पाहिले तर समाजातील डेशिंग नेतृत्व हरपले आहे. आपल्या सर्वांच्या हृदयात आजही कायम राहिलेले दिवंगत मसूदभाई कोहारी आज आपल्यात नाहीत.आल्हा त्यांची मगफिरत करो.असे अभ्यासू डेशिंग नेतृत्व जाण्याने समाजाला खूप मोठी हानी झालेली आहे. आणि ही खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती.
पण आज मा.अनवरभाई यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध प्रकारचे उद्भवणारे प्रश्न हाताळले जातात ते सोडवले जातात.पण त्यांची खासियत मित्रपरिवारांकडून सांगायला मिळते की, स्वतःचं घर मशिदीसाठी दान करुन परिवाराला घेऊन भाड्याने राहत आहे.नगरातील गणपती मंदिरातील अनेक उपक्रमात त्यांचा प्रमुख वाटा असतो.ही त्यांची प्रशंसा मित्रपरिवारांच्याकडून सांगितली जाते. त्यांचे समाजकार्य तळागाळाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी उभे राहतात. त्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा मित्रपरिवार मोहसीनभाई,कृष्णामामा मुकणे,कमालभाई शेख, समीभाई,बाळा पाटील,कामील भाई, सलमानभाई,शफीकभाई,रब्बानी शेख,हैदर शेख,अशरफ शेख,सुरेश आंबवले नेहमी तत्पर असतात.अशा प्रकारे त्यांच्या वाढदिवसाचा अनोखा कार्यक्रम साजरा झाला असून त्यांना डायमंड ग्रुप आणि त्यांच्या चाहत्यां मित्रपरिवारांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.