नाशिक येथिल दान पारमिता फाऊंडेशनच्या वतीने,सर जेम्स प्रिन्सेप सर जेम्स प्रिन्सेप धम्मलिपि स्टार प्रचारक पुरस्कार वितरण,,
नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक:- सर जेम्स प्रिन्सेप यांच्या २२४ व्या जयंती निमित्ताने नागपूर येथील हिंदि साहित्य संमेलन येथे विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले,
सर जेम्स प्रिन्सेप यांनी भारतात येऊन धम्मलिपि वर मोठे कार्य केले, मृतावस्थेत असलेल्या ह्या लिपीस त्यांनी जीवदान देऊन ह्या लिपिची संपूर्ण वर्णमाला त्यांनी बनवली व त्यामुळे सम्राट अशोक , तथागत बुद्ध यांची ओळख संपूर्ण जगास झाली,
२१ व्या वर्षी भारतात येऊन त्यांनी २० वर्षे बौद्ध संस्कृती , धम्मलिपि , खरोष्टी लिपि ह्यांच्या वर्णमाला बनवल्या, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाशिक येथील दान पारमिता फाऊंडेशन मागील वर्षांपासून त्यांचा जन्म दिवस विश्व धम्मलिपि गौरव दिवस म्हणून साजरा करत आहे,
ह्या निमित्ताने बौद्ध संस्कृती व धम्मलिपि विषयावर व्याख्यान आयोजित केले जाते , फाउंडेशनच्या अंतर्गत धम्मलिपि शिकलेल्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रमाणपत्र वितरीत केल्या जाते,
परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना
२०२३ बेस्ट धम्मलिपि स्टुडंट अवॉर्ड प्रीती रामटेके, वर्षार्ती इंदूरकर, अलका गवई , दिशा वानखेडे, करुणा गोडबोले ह्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले,
उत्कृष्ट असाईनमेंट बनवणाऱ्या अशोक डूले, श्रीयांश नंदागवळी, शितल शंभरकर ह्या तीन विद्यार्थ्यांना ट्रॉफी करून गौरविण्यात आले,
तसेच धम्मलिपि शिकवणाऱ्या शिक्षकांना जेम्स प्रिन्सेप यांच्या नावाने पुरस्काराने गौरविण्यात येते,
रुपाली गायकवाड , मयुरी दामोदर, विजया उमाळे ,अलका गवई, निरझरा रामटेके,
तेजल नंदेश्वर, ज्योती खैरमोडे, करुणा गोडबोले , मनीषा साळवे , वंदना ओरके, उज्वला भारसाकळे, नेहा राऊत – यादव ,छाया पाटील,
शांता मुलगे इत्यादी महिला शिक्षकांना सर जेम्स प्रिन्सेप धम्मलिपि स्टार प्रचारक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,
ह्या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन दान पारमिता फाउंडेशनच्या वतीने सुनील खरे, संतोष आंभोरे,
प्रविण जाधव व नागपूर मधील त्यांच्या टीमने केले होते