बदलापूर !! कुळगाव बदलापुर नगरपालिका कार्यालया समोर दि,११ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार चक्का जाम आंदोलन

कुळगाव बदलापुर नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना व वंचित बहुजन आघाडी तसेच ईतर संघटनांच्या माध्यमातून दिनांक ७ फेब्रुवारी पासून बेमुदत लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे, परंतु पालिका प्रशासनाला या बाबत कोणतेही गांभीर्य नसल्याने सर्वच संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आंदोलन आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे,आज सकाळी या सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती, या वेळी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्या नुसार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११;३० ते १२:३० कुळगाव बदलापुर नगरपालिका कार्यालया समोर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे, वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी दिली आहे, त्या बाबतचे निवेदन आज कुळगाव बदलापुर नगरपालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाला सादर करण्यात आले आहे,