मुख्यमंत्री व सर्व पक्षीय नेत्यांची कर्मवीर दादासाहेब गायकवाड ओझर विमानतळ नामकरण समिती घेणार भेट-अण्णासाहेब कटारे

नाशिक (प्रतिनिधी) :- कर्मवीर दादासाहेब गायकवाड नामकरण समितीची बैठक मुख्य निमंत्रक अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकित सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, काँग्रेस नेते नानासाहेब पटोले, आदी सर्व पक्षीय नेत्यांची समितीच्या वतीने भेट घेऊन, मागणीनामा सादर करण्यात येणार आहे. ओझर विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव मिळावे म्हणून शासन दरबारी सतत पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड ओझर विमानतळ नामकरण समिती नाशिकच्या वतीने प्रयत्न करीत आहेत
नाशिक जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, शासकीय अधिकारी यांना समक्ष भेटून समितीच्या वतीने मागणीनामा सादर केलेला आहे सर्वच लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी ओझर विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव मिळावे म्हणून सकारात्मक भूमिकेत आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर विमानतळास मिळावे या करीता मुंबई स्तरावर जी समिती कार्यरत होती ती समिती देखील आजच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यात स्थापन असलेल्या पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड ओझर विमानतळ नामकरण समिती, नाशिक मध्ये विलीन करण्याचा ठराव देखील आज बहुमताने मंजूर करण्यात आला.
बैठकीस प्रामुख्याने रिपब्लिकन नेते तानसेन भाई ननावरे,वंचित आघाडी चे नेते बाळासाहेब जी शिंदे, जिल्हाध्यक्ष पवन भाऊ पवार,रिपाई नेते चिंतामण भाई गांगुर्डे,रिपाई एकतावादीचे आदेश भाऊ पगारे, पत्रकार महादू पवार, अरुण केदारे, रिपब्लिकन नेते दीपक भाई ननावरे, महिला आघाडी नेत्या लक्ष्मी ताई ताठे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू राजेंद्र गायकवाड , अर्जुन उघडे, दिनेश पगारे, रिपब्लिकन नेते दिलीप काका प्रधान, सुभाष गोहाडे, रिपब्लिकन नेते मदन अण्णा शिंदे,नेते भिवानंदजी काळे, वंचित शहराध्यक्ष अविनाश शिंदे, रिपब्लिकन वार्ता संपादक डॉ.अनिल आठवले, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष युवा नेते प्रतीक सोनटक्के, वंचितचे पंडित नेटावटे, विश्वनाथ भालेराव, संजय भालेराव, विजय गांगुर्डे, रुपेश सोनवणे, प्रशांत कटारे, धम्मापाल वाहुळे, इंद्रजित भालेराव, संदीप उन्हवणे, विनोद भालेराव, डी.जी पगारे, आदी उपस्थित होते.