धम्म सृष्टी फाउंडेशन कल्याण (रजि.) वतीने साई सेवा वृद्धाश्रम डोंबिवली पश्चिम येथे धान्याचे वाटप

रविवार दिनांक 18/12/2022 रोजी धम्म सृष्टी फाउंडेशन कल्याण च्या वतीने कालकथित नरेंद्र ज्ञानदेव येवले यांच्या वाढदिवसाच्या स्मृती प्रित्यर्थ साई सेवा वृद्धाश्रम डोंबिवली पश्चिम येथे धान्याचे वाटप करण्यात आले.*
धम्म सृष्टी फाउंडेशन कल्याण या संस्थेची स्थापना शिक्षण ,आरोग्य, समाजातील दुर्बल घटक, यासारख्या सर्व क्षेत्रांमध्ये काम करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे. यासारखे अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा मानस धम्म सृष्टी फाउंडेशन च्या वतीने करण्यात आलेला आहे. आयु. राखी प्रवीण कांबळे यांच्या संकल्पनेतून धम्म सृष्टी फाउंडेशन कल्याण संस्थेची स्थापना करण्यात आली. सदर संस्थेचे संस्थापक संचालक प्रवीण प्रल्हाद कांबळे, राखी प्रवीण कांबळे, व छाया नरेंद्र येवले हे आहेत.
सदर कार्यक्रम प्रसंगी साई सेवा वृद्धाश्रमाच्या संचालिका सुवर्णा मॅडम, निवृत्त पोलिस अधिकारी विलास वाघमारे साहेब, रजनी वाघमारे,राहूल वाघमारे,सुरज वाघमारे,उषा मिसाळ,इन्कमटॅक्स ऑफिसर प्रतिक मिसाळ,प्रेरणा मिसाळ, सिरम इन्स्टिटय़ूट चे वीरेंद्र येवले,सृष्टी कांबळे,आकांक्षा,पराग येवले,सक्षम कांबळे उपस्थित होते.