क्रीडा व मनोरंजन

आमदार पी.एन.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुईखडी येथे जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

डॉ सुरेश राठोड
कोल्हापूर..याज कडून
आमदार पी.एन.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीने गेली 8 वर्ष पुईखडी (तालुका करवीर) येथे कृष्णा धोत्रे यांच्या प्रेमरूपी पुढाकाराने आयोजित केला जातो. तरी यावेळी येत्या 3 जानेवारीपासून जिल्हास्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती करवीर पंचायत समितीच्या माजी सभापती आश्विनी धोत्रे यांनी दिली. स्पर्धा सलग तीन दिवस चालणार असून, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते व स्थायी समितीचे माझी सभापती सारंगधर देशमुख, पीरवाडी सरपंच शिल्पा शेळके, उपसरपंच शिवाजी रावळ व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आमदार पी.एन.पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. विजेत्या संघाला प्रथम क्रमांक रुपये 9292 आणि उपविजेत्या संघाला रुपये 6363 रुपये रोख व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येईल. त्याचा लाभ स्पर्धकांनी व नागरिकांनी घ्यावा. असे आव्हान धोत्रे यांच्याकडून करण्यात आले आहे. यावेळी कृष्णा धोत्रे, संदीप पाटील, सरदार पाटील, विष्णू पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.