फेसबुक गेम हा चित्रपट महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होणार
प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी पुणे

ललिता पवार प्रोडक्सन फिल्म आर्ट प्रस्तुत.व समीर पवार निर्मित.फेसबुक गेम. एक अनोखा खेळ? हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रात प्रदर्शित होणार याची कथा आताच्या फेसबुक सोशल मीडिया या विषयावरचा एक सस्पेन्स थरार कथन कावर आधारित आहे.
एक मुलगी सोशल मीडिया वरून प्रेमा ची कशी सुरुवात करते व आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून खुन्याच्या टोका पर्यंत कशी जाऊन पोचते आणि पुरुषांना आपल्या जाळ्यात घेऊन त्यांचा कसा गैरवापर करून पैसे साठी त्याचा खून करते हे या चित्रपटात दाखवायनाचा प्रयत्न केला आहे. आणि फेसबुक हे वाईट गोष्टी साठी नसून एक चांगल्या कामा साठी त्याचा कसा फायदा आहे आजच्या काळात व त्याचा गैरवापर हा ना होता चांगल्या गोष्टी साठी करावा हा यात दाखवले आहे. या चित्रपटात सस्पेन्स थ्रीलर रोमान्स प्रेम व मैत्री या सर्वा गोष्टी फिल्म मध्ये आहे.
ललिता पवार, प्रोडक्शन: निर्माता दिग्दर्शक समीर पवार,निर्माते मानसी मापुस्कर पवार.रुद्राश पवार,निर्मती प्रमुख रोजाना अंबी,कथा समीर पवार.गीत डॉ श्रीकांत नरुळे,महेश औटी,संगीत पंकज प्रीतम,कुनाल भगत,गायक अभिजित सावंत,नेहा राजपाल. दिपाली समोय्या,अभिजित महाडिक,छायाकन जितू आचरेकर,आर्ट डायरेक्टर बबलू पवार,गजानन फुलारी,लाईन प्रोड्युसर सुनीता सिंग,कार्यकारी निर्माता प्रमोद मोहिते,उमेश ठाकूर,चेतन मापुस्कर.प्रमुख कलाकार गिरजा जोशी,अमित भानुशाली, जयराज नायर,अनिकेत केळकर,संदेश जाधव,आणि संजय खापरे,सह कलाकार प्रज्ञा घाडगे,कविता सकट,प्रगती नाईक,विनिता काळे,तुषार खेडेकर,दिपाली जाधव,आयटम सॉन्ग गर्ल सुनीता सिंग,राधीका लहरी आदी दमदार कलाकारांची कलाकृती ने सजलेला हा चित्रपट आहे.