विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे शहरातील प्रसिद्ध व्यक्तीमहत्व सीमा इंग्रोळे “स्री कर्तुत्व आदिशक्ती” पुरस्काराने सन्मानित
पुणे-: - सुनिल ज्ञानदेव भोसले

पुणे!”द रॉयल ग्रुप” चा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा “स्री कर्तुत्व आदिशक्ती” पुरस्कार सोहळा हा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उस्ताहात संपन्न झाला. पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुण्याचे यशस्वी आयोजक नितीन झगरे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.या पुरस्कार सोहळ्यासाठी सिनेअभिनेत्री स्वराज्यरक्षक संभाजी येसूबाई फेम प्राजक्ता गायकवाड, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले,बिग बॉस फेम तृप्तीताई देसाई, देवमाणूस फेम लाला डॉ.डोईफोडे,जनता डेव्हलपर्स समूहाचे युवा उद्योजक गणेश खुडे, प्रसार महाराष्ट्र संचालिका पोर्णिमाताई देशमुख,रॉयल ग्रुप संचालिका कोमल झगरे व कोकण ब्रँड अम्बेसिडर दर्शना पाटील या वेळी उपस्थित होते..
सीमा अनिल इंग्रोळे गेल्या अनेक वर्षा पासून सामाजिक क्षेत्रांत अग्रेसर आहेत. सामजिक आणि औद्योगिक क्षेत्रांत त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याने त्यांना सामाजिक क्षेत्रांतील “स्री कर्तुत्व आदिशक्ती” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सिनेअभिनेत्री स्वराज्य रक्षक संभाजी फेम येसूबाई प्राजक्ता गायकवाड, आणि बिग बॉस फेम तृप्ती ताई देसाई यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. रॉयल ग्रुप साठी त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी आहे.त्या रॉयल ग्रुप च्या असोसिएट पार्टनर आहे. कोल्हापुर आणि मलेशिया मध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
“स्री कर्तुत्व आदिशक्ती” पुरस्कार देऊन सर्व क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जनता डेव्हलपर्स उद्योगसमूहाचे गणेश खुडे, मयुरेश अभ्यंकर, निर्माता चांदभाई शेख, लेखक आबा गायकवाड, रवी मैजिक चे रवी जैन सर, मोनिका जाधव, निता निमजे, आकाश रणदिवे, रोहन सकपाळ,संपादक सुनिल भोसले, अरबाज मुलानी , मोहीनी देडगे आणि कृणाल अकैडमी ,प्रियंका कांबळे, निलम एडके,मानसी शर्मा, वैदेही पोटे,रेणू अग्रवाल, कोकण ब्रँड अम्बेसिडर दर्शना पाटील ,सपोर्टिंग पार्टनर श्वेता धामापुरकर आणि श्री तानाजी कोरटकर साहेब यांनी विशेष सहकार्य केले.