परभणी ते दादर बौद्ध धम्म पदयात्रामध्ये बौद्ध उपासकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा— दिनकर घेवंदे

जालना( प्रतिनिधी ): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनु जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंभिरे यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय बौद्ध भिख्यु महासंघाचे ११० बौद्ध भंते यांच्या उपस्थितीत परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान जिंतूर रोड परभणी येथे भव्य बौद्ध धम्म पद यात्रा प्रारंभ होणार असून ,पुढं चैत्यभूमी दादर मुंबई येथे समारोप होणार आहे.
सदरील ऐतहासिक बौद्ध धम्म पदयात्रास थायलंड येथील ११० भंते व भारतातील बौद्ध भिख्यू संघ सह बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर,सिने अभिनेते गगन, मलिक सह हजारो बौद्ध उपासक व आंबेडकरी अनुयायी उपस्थित राहणार असून ,या अद्वितीय ऐतिहासिक पदत्राचा भाग होण्यासाठी जिल्ह्यातील बौद्ध उपासक व आंबेडकरी अनुयायी तसेच विविध समविचारी संघटना यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी परभणी येथे दि १७ जानेवारी रोजी ज्ञानोपसक महाविद्यालय मैदान जिंतूर रोड येथे सकाळी ठीक ११:३० वाजता तसेच अधिक मदतीसाठी ९९२३७१०१११ या नंबर वरती संपर्क साधावा व आंबेडकरी अनुयायी व बौद्ध उपासक यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा बौद्ध धम्म पदयात्रा जालना जिल्हा समन्वयक धम्म मित्र दिनकरराव घेवंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.