राजकीय

पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॕफ महाराष्ट्र या पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीमध्ये प्रथम वर्धापन दिनी नविन राजकीय वाटचालीचा होणार निर्णय……..

मुंबईः पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॕफ महाराष्ट्र या पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक रविवार दि.8 जाने.2023 रोजी दुपारी 4;00 वा.शासकीय विश्रामगृह बांद्रा येथे संपन्न झाली.सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुंबई प्रदेशचे अध्यक्ष मा.मंगेशजी पगारे साहेब होते तर प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पँथर मा.मिलिंदभाई सुर्वे आणि महाराष्ट्र राज्याचे महासचिव तथा सरचिटणीस प्रा.डॉ.उमेश पवार हे होते.बैठकीमध्ये येणारा पक्षाचा प्रथम वर्धापन दिन दि.9मार्च 2023 रोजी भव्य आणि दिव्य स्वरुपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.सदर वर्धापन दिन कार्यक्रम ज्या ठिकाणी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय 19 फेब्रु.2022 रोजी संकल्प निर्धार मेळाव्यात घेण्यात आला होता त्याच ठिकाणी म्हणजेच शहिद स्मारक,रमाई नगर,घाटकोपर येथे आयोजित करण्यात येईल असे सर्वानुमते ठरवण्यात आले.कार्यक्रमामध्ये आंबेडकरी चळवळीतील विचारवंताना पाचारित करुन आंबेडकरी चळवळीतील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणार्या जेष्ट आणि श्रेष्ट चळवळीतील 30 मान्यवरांचा आदरपुर्वक सन्मान सन्मान चिन्ह देवुन करण्याचा ठराव करण्यात आला.तसेच पक्षाची बांधणी ग्रासरुट पर्यंत करण्याचे ठरवताना वस्ती तेथे शाखा आणि गाव तेथे शाखा या ब्रिद वाक्याप्रमाणे पक्षाची बांधणी करण्याचे ठरवण्यात आले असुन पक्षाच्या बेसिक कमिटी,महिला कमिटी,युवक कमिटी प्रत्येक स्तरावर स्थापन करण्याचे ठरविण्यात आले.तसेच येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॕफ महाराष्ट्र या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याचा मानस करण्यात आला.तसेच पक्षाची भुमिका हा सत्ता किंवा संपत्ती मिळवण्याची नसुन सामाजिक परिवर्तन व व्यवस्था परिवर्तनाची असेल हे येणाऱ्या काळात सिद्ध करण्याची उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांनी प्रतिज्ञाच केली.सदर बैठकीस महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा.अशोकजी तांबे,मा.शशिकांतजी शिंदे,मोहनजी बोदाडे,भिमसेनजी जाधव,मुंबई प्रदेश उपाध्यक्ष गोविंदजी साळवी,अस्लमजी शेख इशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष मा.रोहिदासजी वाघमारे, उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष मा.अनिलजी लगाडे,दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष मा.विक्रांतजी बम्मण,दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष भिमसेनजी जाधव,उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुशिलकुमारजी,उत्तर मध्यचे सुफियानजी शेख,कुर्ला तालुका अध्यक्ष चंद्रकांतजी रुपेकर,कुर्ला धारावी तालुका अध्यक्ष जाॕन सँडेवालजी,नवी मुंबई अध्यक्ष सन्मा.माणिकजी शिंदे,मुलुंड तालुका अध्यक्ष तुकारामजी हेगडे,विक्रोळी तालुका अध्यक्ष प्रमोदजी पांचाळ,रत्नागिरी जिल्हा युवक सरचिटणिस वैभवजी पवार,वसई तालुक्यातुन मनोजजी पवार,मा.शिंदेसाहेब, चिपळूण तालुका अध्यक्ष सुदेशजी पवार,शुद्धोदन पवार,रसिक पवार,अजय कवडे,जिवन कवडे उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.