ठाणे महापालिका हद्दीतील विकास कामात बाधित झालेल “बुद्ध विहार”, पुन्हा बांधून देण्यास विकासकासह पालिका प्रशासनाचा विरोध,तर हनुमान मंदिर बांधुन देण्यास सहमती,, आंबेडकरी अनुयायी आक्रमक,
प्रतिनिधी! साईनाथ खरात

ठाणे! ठाणे शहरातील जातीय वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या असल्याचे निदर्शनास येत आहे, ठाणे महापालिका हद्दीतील जिजामाता नगरचा भुखंड क्रमांक ४५ रोड न,३३ परिसरातील विकास कामाला सुरुवात करण्यात आली आहे, या कामामुळे या परिसरात असलेले प्राचीन बुध्द विहार आणि एक हनुमान मंदिर या विकासकामां मुळे बाधित होणार आहेत, या अनुषंगाने या ठिकाणी असणारे बौद्ध विहार आणि हनुमान मंदिर त्याच परिसरात पुन्हा नव्याने बांधुन देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे,
परंतु विकासकाने बुद्ध विहार पुन्हा बांधून देण्यास ठाम नकार दर्शवला आहे तर हनुमान मंदिर आणि शंकराचे मंदिर नव्याने बांधुन देण्यास तयारी दाखवली असुन ही मंदिर् बांधण्यासाठी सुरवात देखील केलेली आहे, या ऊलट या विकासकाने ठाणे महापालिका अधिकारी यांना बरोबर घेऊन पालिके मार्फत दिनांक ०९/०१/२०२३ रोजी बुद्ध विहाराला नोटीस बजावून जागा खाली करण्यासाठी बजावले आहे, आणि लवकरच बुद्ध विहारावर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत, या मुळे आंबेडकरी जनते मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे, या मुळे आता ठाणे शहरात जातीय तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे,एकी कडे बाधित झालेले हनुमान मंदिर पुन्हा बांधून देण्यास विकासक तयारी दाखवतो आणि दुसरीकडे बुध्द विहाराला विरोध म्हणजे जातीयवादी समाजकंटकांच्या मनात अद्यापही किती मोठा भेदभाव आहे हे त्यांच्या या कृत्यावरुन लक्षात येतो, ठाणे महापालिका देखील या समाजकंटकांच्या ताटा खालचे मांजर होऊन जर अशा प्रकारची भुमिका घेत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे, ठाणे महापालिकेला शांती प्रिय भगवान बुद्धांचा ईतका तिरस्कार का? संविधानाने वावरणाऱ्या बौद्ध अनुयायांचा ठाणे महापालिका आणि या जातीय वाद्यांना ईतका विटाळ आहे का? बुध्द विहार नष्ट करण्यासाठी कोणत्या जातीयवादी पक्षाचा दबाव महापालिका अधिकाऱ्यांवर आहे?असे अनेक प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केले आहेत,विकासक आणि ठाणे महापालिका करत असलेल्या या कृत्याने दोन समाजात दंगल घडण्याची परिस्थिती निर्माण आली आहे, अशा प्रकारे बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या प्रकरणी स्थानिक आंबेडकरी अनुयायांनी आक्रमक भूमिका घेतली असून ठाणे महापालिकेने याच जागेवर बुद्ध विहार भव्य स्वरूपात पुन्हा बांधून देण्याची मागणी कायम ठेवली असुन ठाणे शहरातील तमाम आंबेडकरी अनुयायींनी महापालिका कार्यालयाला घेराव घालून आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे,वेळ पडल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय आंबेडकरी अनुयायांनी घेतला असून त्या नंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला ठाणे महापालिका जबाबदार असल्याचे बुध्द विहार समितीने पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,