करवीर तालुक्यातील वाशी येथील राजवीर पब्लिक हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
कोल्हापूर प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील वाशी येथील राजवीर पब्लिक स्कूल येथे गुरुवारी (दि.२६) भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी तिरंगी फुग्यांची आकर्षक सजावट अशी नवीन थीम करण्यात आली होती. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दै.रोखठोकचे कार्यकारी संपादक डॉ. सूरेश राठोड यांची उपस्थिती लाभली होती. अध्यक्षस्थानी संस्थापक बी. ए. पाटील होते.
यावेळी सर्वप्रथम पाहुण्यांबरोबर इतर मान्यवरांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाल्यानंतर तिरंगा झेंड्याचे पूजन करून झेंडा फडकवण्यात आला. ध्वजगीत व प्रार्थने नंतर विद्यार्थ्यांनी कवायत व भारतीय विविधता व एकता दर्शवणारे कलाप्रकार, नृत्य , गायन, लेझीम व खेळ सादर केले. अनेक मूलामूलींनी स्त्री सन्मान व त्याची गरज, घटनेची निर्मिती व भारतीय लोकशाहीतील महत्त्व यासह विविध विषयांवर प्रबोधनात्मक भाषणे करून उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी डॉ.सुरेश राठोड म्हणाले, भारत देश म्हणजे फक्त देशाच्या सीमा व 140 करोड लोक नाहीत तर, सर्वांनी भारतीय लोकशाही, स्वातंत्र्य व नागरीकांची समाजाप्रती आवश्यक असणारी मूल्ये अंगिकारावीत, समाजाला आणि देशाला आपल्या महान वारशासह जागतिक स्तरावर प्रगती पथावर गतिमान ठेवण्यासाठी कार्यरत रहावे. राष्ट्रप्रेम तर सर्वांच्यातच आहे पण, या स्कूलचे संस्थापक बी ए पाटील सर यांचे राष्ट्रप्रेम व देशासाठी दानत देण्याचे मोठे साहस मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे राजवीर पब्लिक स्कूलचे विद्यार्थी देशाचे उज्वल भविष्य आहे.
यानंतर कार्यक्रममध्ये जिल्हा स्तरावरील अबकस व अनेक स्पर्धा परीक्षा मधील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना पारीतोषीक वाटप करण्यात आले. तसेच आयकॉन मिस्टर ईंडिया किताब मानकरी वाशी येथील अमृत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास भोगावती साखर कारखाना संचालिका अनिता पाटील, समन्वयक शिवाजीराव बरगे, शाळेचे उपाध्यक्ष महादेव पाटील, संचालक केरबा शेळके, पांडुरंग माळी, दगडू कांबळे, नारायण पाटील, अनिकेत पाटील, सर्जेराव कांबळे उपस्थित होते.
प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका वैष्णवी सरनोबत मॅडम यांनी केले. अध्यक्षस्थानी बी ए पाटील होते. सूत्र संचालन समृद्धी थोरवत व आभार प्रदर्शन वर्षा शिंगणापूरकर यांनी केले. कार्यक्रमासाठी पालक मोठ्या प्रमाणात हजर होते.