समाजसेवक राजुभाऊ निकम समाजभूषण पुरस्काराने सन्मानित,, आदर्श माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले याच्या हस्ते पुरस्कार प्रदान
स्नेहा उत्तम मडावी पुणे

आईसाहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला हे माझे भाग्य,,…. राजूभाऊ निकम
महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी हडपसर पुणे येथे भटक्या विमुक्त जाती सामाजिक आधार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरी भाऊ सावनत यांनी संपूर्ण महाराष्ट्र मधिल उल्लेखनीय कामगिरी करणारे समाजसेवक, पत्रकार, वकील डॉ. क्लास वन अधिकारी, इंजिनियर यांची निवड करून त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले , याच अनुषंगाने समाजसेवक निवस्वार्थी पणे समाजाला न्याय मिळून देणारे सातत्याने समाजसेवेत व्यस्त असणारे सामाजिक कार्यकर्ते व गोसावी नाथ पंथी डवरी समाजातील एका गरीब कुटुंबातील पिंपरी चिंचवडचे राजुभाऊ निकम आज त्यांना खऱ्या अर्थाने कामाची पावती मिळाली आहे,
राज्यस्तरीय महाराष्ट्रातून ज्या मान्यवरांना समजभूषण पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये राजूभाऊ निकम यांना समाजभूषण पुरस्कार आदर्श माता शेवराई ज्ञानदेव भोसले यांच्या हस्ते देण्यात आला, या वेळी उपस्तीत पांडुरंग शेलार साहेब भटक्या विमुक्त जाती सामाजिक आधार संघटनाचे अध्यक्ष हरी भाऊ सावनत, मीनाक्षी ताई आहिरे, कामाक्षी ताई, समजसेविका वनमाला ताई पेंढारकर, पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले, सुरेश आबाजी निकम, गणेश राजू निकम, सपना गणेश निकम, यांची प्रमुख उपस्थिती होती या वेळी आईसाहेबच्या हाताने सन्मान मिळाल्याने खऱ्या अर्थाने माझ्या कामाला यश आले असल्याचे निकम यांनी बोलताना सांगितले, गोरगरिबांना न्याय मिळून देण्यासाठी मी माझ संपूर्ण आयुष्य घालवले असुन,माझ्या आई साहेब शेवराई ज्ञानदेव भोसले यांचा मला आशीर्वाद आहे असे मत राजुभाऊ निकम यांनी व्यक्त केले, या वेळी ऊपस्थित मान्यवरांनी समाजसेवक राजू भाऊ निकम यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या